Police Bust Illegal Tobacco Stock in Chinchwad
पिंपरी : शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, तंबाखू आणि पानमसाल्याचा एक लाख १३ हजार २५० रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई चिंचवड येथे करण्यात आली. स्वप्निल गुणवंत जाधव (वय ३२, रा. जिजामाता पार्क, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी स्वप्निल जाधव याने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून गुटखा, तंबाखू व पानमसाला विक्रीसाठी ठेवला होता.