Three Booked in Pimpri Assault Over Minor Dispute
Sakal
पिंपरी : अल्पवयीन मुलांच्या फिरायला जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चिखलीतील पंतनगर कॉलनी येथे घडली. सफरअली बिपकअली शेख आणि अरसदअली शेख (दोघेही रा. पंतनगर कॉलनी, जाधववाडी, चिखली) तसेच त्यांचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर हुझेपा हालीम खान (रा. पंतनगर, कॉलनी, जाधववाडी, चिखली) असे जखमीचे नाव असून या प्रकरणी त्यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.