esakal | मुले शोधतायेत चार भिंतींच्या आत आनंद!
sakal

बोलून बातमी शोधा

Child

मुले शोधतायेत चार भिंतींच्या आत आनंद!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा संपून मेपासून उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद अनेक मुले घेतात. मैदानावर खेळणे, मामाच्या गावाला जाणे अशा कित्येक गोष्टी ती करतात. पण, कोरोना व लॉकडाउनमुळे हा आनंदच हिरावून घेतला आहे. मग, काय चार भिंतींच्या आत पिंजरातलं जीवन ते जगत आहेत. पण त्यातही आनंद शोधत आहेत, जगण्यातला आनंद.

ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाइन लेक्चर झाल्यानंतर दिवसभर काय करायचे, असे अनेक प्रश्‍न मुलांसमोर असायचे. आता तर ऑनलाइन लेक्चरही संपले आहेत. मग, नुसते घरात बसून करायचे काय? बोर होतंय, असंच ना! पण, पालकांच्या मदतीने काही मुलांनी आता नवीन गोष्टी शिकण्याचा आणि छंद जोपासण्याचा जणूकाही चंगच बांधला असल्याचे दिसून आले. काही मुलांशी संपर्क साधल्यानंतर या बाबी दिसून आल्या. काही मुले आता नवीन वाद्य वाजवायला शिकताहेत. तर काहींनी पुन्हा कॅरमचे डाव मांडले आहेत. अनेक जण नवीन झाडे लावण्यात गुंग आहे. तर, काही चिमुकल्यांनी घरातच भातुकलीचा खेळ मांडलाय. पण, काहींनी खूप अभ्यास करायचं मनावर घेतलेलं दिसतंय. ते काहीही करत असले तरी, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आनंद शोधताना दिसतोय, हे मात्र खरं. पण, या चिमुकल्यांना ओढ लागली आहे. कधी एकदाचा कोरोना जातो आणि आम्ही घराबाहेर खेळायला पळतो, याची.

हेही वाचा: ‘ऑटो क्लस्टर’मध्ये वायसीएम पाठवणार रुग्ण; आयुक्तांचा आदेश

मुलांनी वेळ वाया न घालवता, संधीचा फायदा घेऊन नवीन कला अवगत केल्या पाहिजे. याचा फायदा त्यांना भविष्यात नक्की होईल.

- जयश्री नेतेनसकर, पालक, शिंदे वस्ती, रावेत

विद्यार्थी म्हणतात...

चिंचवड येथील विद्यार्थिनी ओजस्वी कोंढारे म्हणाली, ‘‘अनेकांना ऑक्सिजन कमी पडत असल्याचे बातम्यांमधून दिसतंय. त्यामुळे लॉकडाउनमध्ये आमच्या अंगणात झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. जेणेकरून पुढील काळात भरपूर ऑक्सिजन मिळेल.’’

म्हाळसाकांत चौक, आकुर्डी, प्राधिकरण येथील विद्यार्थी वरद बोऱ्हाडे म्हणाला, ‘‘आई नेहमी नवीन नवीन गोष्टी करायला सांगते. लॉकडाउनमध्ये कुकिंग, चित्रकला, हस्तकला अशा अनेक गोष्टी आईने मला करायला शिकवल्या आहेत.’

loading image