Chinchwad By Election : "महाविकास आघाडीचं सरकार..."; आदित्य ठाकरेंनी सांगितली जनतेची 'मन की बात'

"भाजपनं आपल्या राक्षसी महत्वाकांक्षेसाठी गद्दार गँगच्या नेत्याला पुढे आणलं," अशा शब्दांत त्यांनी मुख्यंत्र्यांवरही निशाणा साधला.
Aditya Thackeray
Aditya Thackeray esakal

Chinchawad ByElection : चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारसभेत आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा आणा अशी सध्या लोक विनंती करत आहेत, असं सांगताना याबाबतचा एक किस्साही त्यांनी कथन केला. (Chinchawad ByElection We want MVA Govt again Aditya Thackeray told story of people mind)

Aditya Thackeray
Mumbai: झोपडपट्टीला भीषण आग,५० हून अधिक झोपड्या खाक; दोघांचा मृत्यू

आदित्य ठाकरे म्हणाले, "आपला महाराष्ट्रा प्रगती करत होता, देशात पहिला येत होता. त्यावेळी भाजपच्या पोटात दुखःत होतं कारण त्यांचं शासन असलेली राज्ये पुढे का नाहीत, असं त्यांना वाटत होतं. राज्याची प्रगती रोखण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीला पुढे आणलं. भाजपनं आपल्या राक्षसी महात्वाकांक्षेसाठी या गद्दार गँगच्या नेत्याला पुढे आणलं"

Aditya Thackeray
Sadabhaou Khot : पवार आत्मचरित्रात करतात अदानींचं कौतुक; ओसाड गावचे पाटील म्हणत सदाभाऊंचा घणाघात

उद्धव ठाकरेंना कोविड झालेला असताना दोन वेळा सर्जरी झालेली असताना त्यांच्यावर 'या' गँगनं वार केले आणि आपलं सरकार पाडलं. आज महाराष्ट्रात फिरत असताना अनेक लोक मला भेटतात. माझ्या दौऱ्यावेळी लोक चौकाचौकात उभे असतात ते माझी गाडी थांबवतात आणि मला सांगतात काहीही करा पण महाविकास आघाडीचं सरकार परत आणा. आम्हाला तुमची गरज आहे, मविआची गरज आहे.

खास करुन महिला-भगिनी म्हणतात की, बाळा घरी जा आणि सांग 'माझा विश्वास, माझा उद्धव' एवढा विश्वास जनेताच महाविकास आघाडीवर आहे, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com