Chinchwad Bypoll Election : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीत नवमतदारांचा उत्साह; समाज परिवर्तनासाठी आमचे मतदान

तरुण-तरुणींच्या चेहऱ्यावर मतदान करण्याचा हक्क मिळाल्याचा आनंद
Chinchwad Bypoll Election Enthusiasm of new voters politics vote youth vote for social change
Chinchwad Bypoll Election Enthusiasm of new voters politics vote youth vote for social changesakal

पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीत मतदानासाठी शहरातील विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच नवमतदारांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. मतदान करण्याचा हक्क मिळाल्याचा आनंद नवमतदार तरुण-तरुणींच्या चेहऱ्यावर रविवारी ओसंडून वाहत होता.

पहिल्यांदाच मतदान केल्याचे समाधान आणि बोटावर लावलेल्या शाईची आठवण कायम ठेवण्यासाठी सेल्फीची लगबग असे चित्र मतदान केंद्रावर दिसत होते. अनेकांनी मतदार यादीत नावे शोधण्यापासून प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेची उत्सुकतेने माहिती करून घेतली. अनेक मतदान केंद्रांमध्ये सहकुटुंब किंवा मित्रमंडळींसमवेत मतदान करून सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट करण्यात येत होते.

नवमतदार म्हणतात

‘‘मतदान करण्यासाठी येत असतानाच मला प्रचंड उत्सुकता होती. मतदानाची प्रक्रिया पहिल्यांदाच जवळून पाहता आली. ईव्हीएम मशीनवर मतदान करतानाचा आनंद मला मिळाला.

’’ -प्राजक्ता प्रभात

‘‘यावर्षी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा मतदान केले आहे. उमेदवाराची प्रतिमा आणि कार्याचा विचार मी निश्‍चित केला आहे.’’

- संस्कृती बाबर

‘‘आपण पहिल्यांदा मतदान करणार आहोत, याचा आनंद होता. लोकशाही बळकट करण्याबरोबरच देश हित जोपासण्यासाठी आज प्रथम मतदान केले. ’’

- गायत्री यादव

‘‘पहिल्यांदाच मतदान करायचे म्हणून मनात खूप कुतूहल होते. मतदान कसे करतात, यावेळी कोणते उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, त्यांचे पक्ष याची माहिती मी वाचली होती. त्यामुळे मला योग्य वाटलेल्या उमेदरावाला मत दिले. ’’

- श्रद्घा महामुनी

‘मी आज पहिल्यांदाच मतदान केले, त्यामुळे भारी वाटतंय. आत्तापर्यंत घरात आई-बाबांचा राजकारण, निवडणुकांबद्दलचा संवाद ऐकला होता. मतदान महत्त्वाचं असते, हे सतत कानावर पडले होते त्यामुळे मतदानाचे माझे कार्ड आल्यावर खूष झालो.’’

- प्रणव गायकवाड

‘‘पहिल्यांदा मतदान करणार असल्याने मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. माझे एक मत मोलाचे असल्याने हुशार, सुशिक्षित, कार्यक्षम, कौशल्यवान, जनसंपर्क असणाऱ्या उमेदवाराचाच विचार करून मतदान केले आहे.’’

-पल्लवी कोप्रेकर

‘‘आज मी पहिल्यांदा मतदान केले. त्यामुळे आमच्या मागण्या केंद्रात नेणाऱ्या उमेदरावाला मत द्यायचे, असे मी ठरवले होते.मतदानानंतर बोटावर लागलेली पहिली शाई पाहताना मजा वाटली.’’

-प्राजक्ता काटे

‘‘मतदानाबाबत मला आधीपासूनच कुतूहल होते. उमेदवार जाहीर झाल्यानंतर मी २८ उमेदवारांचा अभ्यास केला होता. माझी मते ज्यांच्याशी जुळतात, त्यांनाच मी मतदान केले आहे.’’

-पुजा जकनाळे,

‘‘विशेष म्हणजे, यंदा मतदान करायला मिळणार म्हणून आम्ही आठ मित्रांनी मिळून एकत्र मतदार अर्ज घेतला होता. त्यातील दोघांची नावे यादीत आली नाहीत; पण आम्ही बाकीच्यांनी आवर्जून मतदान केले.’’

-मैथिली झोपे

‘‘मी एकटीच मतदानाला गेले होते. अनेकजण मतदान न करता सरकारला नावे ठेवतात, ही मानसिकता अयोग्य आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या मित्रांनी नुसती टीका करण्यापेक्षा मतदान कर्तव्य पूर्ण करायचे ठरवले होते.’’

-शिल्पीका शेट्टी

‘‘सकाळी आठ वाजताच मी मतदान केले. कोणत्या उमेदरावाराला मत द्यायचे हा निर्णय माझा मी घेतला. मतदानाचे कर्तव्य बजावल्यावर मी देशाचा सुजाण नागरिक झालो आहे, अशी भावना मनात आली.’’

-नुतन जामदार

‘‘यावर्षी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा मतदान केले आहे. तरुणांसाठीच्या योजना राबवून शिक्षण, रोजगाराकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. ’’

-ईशा काळे

‘‘मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य असून, ते आपण बजावलेच पाहिजे. या भावनेतून मतदान केले.’’

-साक्षी पिंपळे

‘‘मतदारांनी मतदानाचे गांभीर्य जाणले पाहिजे. त्यामुळे नव्या पिढीनेही मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.’’

-श्रेयश जगताप

‘‘पहिल्यांदा मतदान केल्याचा आनंद नक्कीच आहे. त्याचबरोबर आता जबाबदारीचीही जाणीव वाढली आहे.’’

-तन्मय कर

‘‘उमेदवाराने संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला हक्क मिळवून देऊन सर्वसमावेशक विकास साधला पाहिजे. अशाच उमेदवाराला मतदान केले आहे.’’

-तानिया दत्ता

‘‘बहीण आणि मी यावेळी मतदानाचा हक्क पहिल्यांदा बजावला. आपल्याला आता मतदानाचा हक्क मिळाला आहे, या गोष्टीचा खूप आनंद होतोय. ’’

-ईश्‍वरी सारंग

‘‘आपण ज्याला मत देणार आहे, तो उमेदवार योग्य आहे का, निवडून आल्यावर तो विकासाची कामे करणार का, याचा विचार करूनच पहिल्यांदा मतदान केले.’’

-लक्ष्मी सारंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com