
Chitra Wagh : संजय राठोड यांच्या विरुध्द माझी लढाई सुरुच आहे; चित्रा वाघ
पिंपरी : मंत्री संजय राठोड यांच्या विरुध्द माझी लढाई सुुरुच आहे. मी न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. माझी ही लाढाई एका कारणासाठी आहे. मला आत्ता प्रश्न विचारणारे तेव्हा कुठे होते, अशा प्रश्न भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शुक्रवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत उपस्थित केला. भजापा महिला मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी पिंपळे गुरव येथे आलेल्या असताना त्या बोलत होत्या. एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मला कोणीही गप्प बसा असे म्हटलेले नाही. आमच्याबाबत गैरसमज पसरविला जात आहे. जेव्हा रस्त्यावरची लढाई होती तेव्हा मी रस्त्यावर लढले. आता न्यायालयीन लढाई आहे. ज्यांना यात सामिल व्हायचे ते होवू शकतात. त्या याचिकेला आणखी बळकटी येईल.
राज्यापालांबाबत भाजपाची भूमिका नेते म्हणून उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. तीच पक्षाची व माझी भूमिका आहे. संजय राऊत वादग्रस्त बोलतात, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलले. त्यांना आम्ही सर्वज्ञानी म्हणतो, असे सांगितले. तर; भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधभानांबाबत विचारले असता, प्रसाद लाड आदिंची चूक झाली तर; त्यांनी माफी मागितली आहे. भाजपा हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. नवीन मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
न्यायालयाची याचिका स्विकारते
न्यायालयाने याचिका दाखल करुन घेतली आहे, ते मी स्विकारते. न्यायालयाची मला नोटीस मिळाल्यास मी तिकडे जाईल, असे चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी शिरुर कासार येथील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केल्याबाबात बोलताना सांगितले.
उत्तर प्रदेश प्रमाणे ‘लव्ह जिहाद’ कायदा राज्यात लागू केला पाहिजे नैसर्गिक चक्र बदलत आहे. १२-१३ वर्षांच्या मुली वयात येत आहेत. त्यांना बळजबरीने पळवून नेले जात आहे. अशा मुलींचे व त्यांच्या पालकांचेही समूपदेशन होणे गरजेचे आहे. श्रध्दा वालकरची झालेली हत्या ही अमानवी आहे. त्यामुळे ही बाब पुढे आली आहे. उत्तर प्रदेश प्रमाणे ‘लव्ह जिहाद’ कायदा राज्यात लागू केला पाहिजे, असे सांगतानाच एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, कुठल्याही विकृतीला जात-धर्म नसतो.