भोसरी : इंद्रायणीनगरमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होत नसल्याने नागरिक हतबल...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

भोसरीतील इंद्रायणीनगरातील राजवाड्यातील  इमारत क्रमांक अकराजवळील विद्युत रोहीत्राला शुक्रवारी (ता. ११) संध्याकाळी पावणेचारच्या सुमारास आग लागून बंद पडला होता. मात्र शनिवारी (ता. १२) दुपारपर्यंतही  राजवाडा परिसर, निसर्ग कॅालनी, नाना-नानी पार्कचा काही भाग आदी परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

भोसरी : येथील इंद्रायणीनगरातील राजवाडा परिसरातील शुक्रवारी (ता. ११) संध्याकाळी चारच्या सुमारास खंडीत झालेला वीज पुरवठा शनिवारी (ता. १२) दुपारी तीन पर्यंतही सुरळीत न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वीज समस्येविषयी नागरिकांनी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यास त्यांच्याकडून वरिष्ठांशी संपर्क साधण्यास सांगण्यात येत आहे. मात्र महवितरणचे काही अधिकारी सुट्टीवर तर काहींचा संपर्क होत नाही. त्यामुळे कोणाशी संपर्क साधायचा असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरीतील इंद्रायणीनगरातील राजवाड्यातील  इमारत क्रमांक अकराजवळील विद्युत रोहीत्राला शुक्रवारी (ता. ११) संध्याकाळी पावणेचारच्या सुमारास आग लागून बंद पडला होता. मात्र शनिवारी (ता. १२) दुपारपर्यंतही  राजवाडा परिसर, निसर्ग कॅालनी, नाना-नानी पार्कचा काही भाग आदी परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे महावितरणचे काही संबधित उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता रजेवर आहेत. इंद्रायणीनगरात शनिवारी (ता. ५) झालेल्या विद्युत रोहीत्राच्या स्फोटात तीन निष्पाप नागरिकांना प्राण गमवावा लागला होता. याबद्दल महावितरणच्या संबंधित पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध महावितरणची कारवाई सुरू आहे. त्यामुळे येथे काम करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी वीज खंडीतची समस्या सोडविण्यास विनंती केल्यावर ती जबाबदारी कर्मचारी घेण्यास तयार नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा असे कर्मचाऱ्यांद्वारे नागरिकांना सांगितले जात आहे. मात्र संबंधित अधिकारीच उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची समस्या वाढली आहे.

महत्त्वाची बातमी : पुणे जिल्ह्यातील `हा` भाग उद्यापासून सात दिवस राहणार बंद 

''इमारत क्रमांक अकराजवळील विद्युत रोहीत्र सुस्थितीत आहे. मात्र खबरदारी म्हणून हे विद्युत रोहीत्र बदलण्यात येणार आहे. शनिवारी (ता. १२) संध्याकाळपर्यंत येथील विद्युत पुरवठा सुरळीत होईल.''
-शिवाजी वायफळकर, कार्यकारी अभियंता, पिंपरी विभाग

चोवीस तास खंडीत वीजपुरवठ्यामुळे समस्या...
-गृहिणींना पाणी भरता आले नाही.
-मोबाईल स्वीच ऑफ झाल्याने नागरिकांना संपर्क साधण्यास अडचण.
-विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास बुडाले.
-शीतगृह बंद राहिल्याने दुकानदारांना दुग्धजन्य पदार्थ साठविण्यात अडचण आली.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. शनिवारी राजवाड्यात पाण्याचा दिवस आहे. त्याचप्रमाणे राजवाडा इमारतींमध्ये पाणी साठविण्यासाठीची टाकी व्यवस्था नाही. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने वरच्या मजल्यावरील नागरिकांना पाणी भरता आले नाही. त्यामुळे रविवारी (ता. १३) महापालिकेने राजवाडा परिसरात  पाणी सोडण्याची विनंती येथील महिलांनी केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens are helpless as they are not in touch with MSEDCL officials