वातावरणातील बदलाचा श्‍वानांना फटका

मालकांच्या चिंतेत वाढ, काळजी घेण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन
वातावरणातील बदलाचा श्‍वानांना फटका
वातावरणातील बदलाचा श्‍वानांना फटकाsakal

पिंपरी : शहरात गारठा वाढला आहे. वातावरणात बदल होत आहे. अशा परिस्थितीत मनुष्य स्वत:ची काळजी घेत आहे. परंतु, आपल्या श्वानांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या श्वानमालकांची चिंता वाढली आहे. सोसायटी, बंगले तसेच चाळीमध्ये राहणाऱ्या मुक्या श्वानांना सर्दी, खोकला, शिंका व वारंवार येणाऱ्या तापामुळे श्वानांची तब्येत बिघडली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात उच्चभ्रू जातीचे श्वान मोठ्या प्रमाणात आहेत. दहा हजार रुपयांपासून ते अडीच लाख किमतीचे श्वान पाळण्याची क्रेझ आहे. लॅब्रेडॉर, रॉटविलर, जर्मन शेफर्ड, गोल्डन रिट्रीव्हर, पग, बॉक्सर, डालमेशिअन, साइबेरिअयन हस्की, शिझ्झू यांचा समावेश आहे. त्यादृष्टीने पाळीव श्वानांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या ऋतूत श्वान आरामदायी, आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश त्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यातून डी ३ व्हिटॅमिन अत्यावश्यक आहे. अन्यथा, श्वानाचे शरीर खूप थंड झाल्यावर हिमबाधेची लक्षण दिसून येत आहेत. हिमबाधेमुळे श्वानांचे कान, पंजे आणि शेपूट व ऊतींमध्ये फिक्कट गुलाबी, राखाडी व त्वचा काळी पडलेली दिसून आली आहे.

वातावरणातील बदलाचा श्‍वानांना फटका
‘बार्टी’ला गरज तीनशे कोटींची, मिळाला तुटपुंजा निधी : माने

श्वानाचा थंडीत जास्त वेळ गेल्यास त्यामध्ये नैराश्य, आळस आणि कमकुवतपणाची लक्षणे दिसून येत आहेत. अशावेळी श्वान रडून थरथर कापत आहेत. याला हायपोथर्मिया असेही म्हणतात. हिवाळा श्वानांच्या मानसिकतेवर अतिरिक्त ताण आणत आहे. म्हणून, इतर तणाव निर्माण करणारे टक काढून टाकण्यासाठी श्वानावर जंतनाशक उपचार शक्य तितक्या लवकर केले पाहिजे. पोटात कृमी तयार होता कामा नये. श्वानांचे हेअर फॉल, इचिंग व पॅचेस रोखणे आवश्यक आहे. तसेच श्वानाचे वजन, आहार, व वेळेत औषधोपचार करणे आवश्यक आहे.

अशी घ्या श्वानाची काळजी

  • थंड जमिनीवर झोपू देऊ नका

  • उबदार राहण्यासाठी योग्य बिछाना निवडा

  • तापमान थोडे गरम असेल तेव्हा त्याला चालवा

  • सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चालणे टाळा

  • पाण्याच्या भांड्याजवळ पोचता येत असल्याची खात्री करा

  • पाण्याचे तापमान तपासा आणि वारंवार बदला

  • जास्त प्रमाणात खायला घालणे टाळा

  • क्रियाकलाप स्तरावर लक्ष द्या आणि त्यानुसार त्याच्या कॅलरीज समायोजित करा

  • श्वानाचे पंजे केसाळ असतील तर त्याच्या पंजाच्या दरम्यान वाढणारे केस ट्रिम करा

  • पंजाचे रक्षण करण्यासाठी श्वान बूट वापरा

वातावरणातील बदलाचा श्‍वानांना फटका
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत २१ पैकी सहा बिनविरोध

वयस्कर प्राण्यांची शक्यतो जास्त देखभाल केली पाहिजे. अन्यथा त्यांना सर्दी, अपचन हे आजार होण्याची शक्यता आहे. थंडीच्या वेळी पाळीव प्राण्यांच्या शरीरावरील केसांमध्ये कोरडेपणा येतो. कोरडेपणा घालविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेलाचा वापर करावा. पंधरा दिवसांतून किंवा महिन्यातून एकदा अंघोळ घालावी.

- अभिजित पाटील, श्वान मानसशास्त्र अभ्यासक

हिवाळ्यात सूर्यप्रकाशाच्या अभावी किंवा कमी तीव्रतेमुळे व्हिटॅमिन ए आणि डी३ ची कमतरता जाणवू शकते, त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्याकरिता व्हिटॅमिन एडी ३ असलेले डी३ किंवा कॉलेकैल्सिफेरॉल लिक्विड्स देणे गरजेचे आहे.

- डॉ. घनश्याम पवार, पशुचिकित्सक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com