हातगाड्यांवरील पेयाचा थंडावा अनारोग्याला निमंत्रण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cold Drinks
हातगाड्यांवरील पेयाचा थंडावा अनारोग्याला निमंत्रण!

हातगाड्यांवरील पेयाचा थंडावा अनारोग्याला निमंत्रण!

पिंपरी - अंगाची लाहीलाही होणाऱ्या दुपारच्या उन्हात (Heat) बाहेर असाल तर, लिंबू सरबत, कुल्फी, शीतपेय विक्री हातगाडीकडे (Hawkers) पावले वळतील. मात्र, सावधान! दहा-पंधरा रूपयांत मिळणारा हा थंडावा (Colddrink) आरोग्याला (Health) हानिकारक (Dangerous) ठरू शकतो, असा इशारा डॉक्टरांनी (Doctor) दिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने काही हातगाड्यांवर गुरुवारी केलेल्या पाहणीत सर्वत्र पाण्यापासून हाताळणीपर्यंत अस्वच्छता असल्याचे दिसून आले.

तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. उष्माघाताने घशाला कोरड पडत आहे. घामाच्या धारांनी माणूस बैचेन होत आहे. डोकं तापले की, पावले आपसूकच थंडगार पेयांकडे वळत आहेत. ही सर्व पेये वरवर पाहता काळ्या माठात किंवा बाटल्यांमध्ये सजून ठेवल्याचे दिसत आहे. मात्र, या शीतपेयांमध्ये वापरले जाणारे पाणी एकूणच अस्वच्छ व नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, नागरिकांनी या शीतपेयांच्या ठेल्यावर जाताना विचारपूर्वक व स्वच्छता पाहणे आवश्यक आहे.

पॅकबंद बाटल्यातील पेयामुळे घशाचे कावीळ, टायफॉईड होण्याची शक्यता असते. उघड्यावर ठेवलेल्या पाणीदार फळांमुळे सरबतांमुळेही ताप, जुलाब, उलट्या, घशाचे विकार, पचनाचे विकार होतात. त्यामुळे स्वतः घरून फळं किंवा आवश्यक लिंबू-पाणी व ताक स्वतः:सोबत बाळगणे गरजेचे आहे.

जुन्या पुणे-मुंबई सेवा रस्त्यालगतच्या हातगाडीभोवती पांथस्थांची मोठी गर्दी झाली होती. चारचाकी-दुचाकी थांबवून लोक सरबत पीत होती. याठिकाणी गेल्यावर प्रतिनिधीला दिसलेले चित्र लोकांचे अनारोग्य वाढेल असेच होते. लोकांनी पिलेले ग्लास विक्रेता शेजारच्याच उघड्या पिंपात विसळून घेत होता. नंतर ग्लास न पुसता पुन्हा त्यातच लिंबू सरबत भरत होता. विसळलेले पाणी अतिशय अशुद्ध झाले होते. तरीही त्यातच पुन्हा ग्लास विसळणे थांबलेले नव्हते. सरबत बनवून ठेवलेल्या पिंपाला गुंडाळलेले कापड मळके होते. हात देखील तो त्यालाच पुसत होता. दुसरीकडे त्याच हाताने बर्फ फोडून लिंबू पिळून रस काढत होता. शेजारी दुसऱ्या पिंपात पाणी भरून ठेवले होते. कधी ते पाणी ग्लासातून, तर कधी वरगळ्यातून तो काढत होता. पिंपही अस्वच्छ दिसत होता. पाणी थंड राहण्यासाठी नावालाच त्याच्याभोवती कापड गुंडाळलेले दिसले. मात्र, या ठिकाणी कोणतेही पॅकबंद स्वच्छ पाणी नव्हते.

चिंचवडगावातील रस्त्यालगत असणाऱ्या बाटल्यांमधील रंगीत पेये विक्री करणाऱ्या दुसऱ्या विक्रेत्यांकडे पेयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्याबाबत चौकशी केली असता, पाण्यात बर्फ मिक्स करून पाणी वारंवार थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसले. ‘सकाळ’ प्रतिनिधीने हे पाणी स्वच्छ आहे का विचारले असता, ‘विक्रेत्याने मिनरल बाटल्यांमधील पाणी आम्ही वापरु शकत नाही. ते आम्हाला परवडत नाही. महापालिकेच्या नळाचे पाणी भरून ठेवतो किंवा बोअरवेलचे पाणी वापरतो’ असे सांगितले.

हे सेवन करा...

नारळ पाणी, लिंबू पाणी, पातळ ताक, लस्सी, दही, उसाचा रस, ताजी, पाणीदार फळं आणि त्यांचे रस, कैरीचे पन्हे, कोकम सरबत, सोलकढी, थंड दूध, द्राक्ष, विविध ताजी तयार केलेली सरबते, फ्रूट पंच, कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी आणि पीच, काकडी सूप

कृत्रिम पेय टाळा...

रस्त्याच्या कडेला बंद बाटल्यांमधील रस, मेडिकल व किराणा दुकानातील विविध रसाचे पाऊच व बाटल्या, आइस टी, लाल मांस, बर्गर आणि हॉट डॉग्स

Web Title: Cold Drinks On Handcarts Invite The Sick Danger

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top