पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील यांनी आज कार्यभार स्विकारला.
आयुक्त राजेश पाटील
आयुक्त राजेश पाटीलSakal

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील यांनी आज कार्यभार स्विकारला.

पिंपरी चिंचवड महापालिकेची विद्यमान मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली आहे. महापालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने घेतला.

त्यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकपदी विद्यमान आयुक्तांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त असणारे राजेश पाटील यांनी प्रशासक पदाचा कार्यभार आज, १४ मार्च २०२२ रोजी स्विकारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com