esakal | केंद्र सरकारच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये कॉंग्रेसची घोषणाबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्र सरकारच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये कॉंग्रेसची घोषणाबाजी

जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध केला. 

केंद्र सरकारच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये कॉंग्रेसची घोषणाबाजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : देशाचा पोशिंदा बळीराजाला उद्ध्वस्त करणारा कायदा केंद्र सरकारने ताबडतोब मागे घ्यावा. यासह विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसने शुक्रवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शन केली. जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. पिंपरी-चिंचवड महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेसह सर्व शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारने शेती विषयक विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे. त्यातील अटी शेतकऱ्यांना मारक असून, त्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत. त्यामुळे शेती विषयक कायदा मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भारतीय जनता पक्ष प्रणित केंद्र सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असून, भांडवलदारांना अनुकूल कायदे करीत आहे, असा आरोप कॉंग्रेसचे शहराध्यक्ष साठे यांनी केला. या घटनेचा शहर कॉंग्रेस निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 'भाजप हटवा, शेतकरी वाचवा', 'शेतकरी विरोधी विधेयक मागे घ्या', 'भाजप हटाव, एमएसपी बचाओ', अशा घोषणा देण्यात आल्या. 

तसेच, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेतील पीडित तरुणीस श्रद्धांजली वाहण्यात आली. पीडित तरुणीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी केंद्र सरकारसह उत्तर प्रदेश सरकारचाही या वेळी निषेध करण्यात आला. हाथरस येथील तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणारे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंता गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने मनाई केली. त्यांना धक्काबुक्की करून अटक केली. ही घटना देश व राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचे लक्षण असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आणि या घटनेचाही निषेध केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतकरी विरोधी कायदा आणि प्रस्तावित कामगार कायदा म्हणजे देशातील शेतकरी व कामगारांचा भांडवलदारांबरोबर हुकूमशाही केंद्र सरकारने केलेला सौदा आहे, अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजाराम देशमुख, प्रदेश सचिव आशिष दुबे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, ज्येष्ठ नेते राजेंद्रसिंह वालिया, विष्णूपंत नेवाळे, लक्ष्मण रुपनर, क्षितीज गायकवाड, शहाबुद्दीन शेख, मयूर जैयस्वाल, सज्जी वर्की, सुनिल राऊत, दिलीप पांढरकर, भाऊसाहेब मुगूटमल, सतिश भोसले, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, प्रतिभा कांबळे, पुजा किरवे, संदेश नवले, संदेश बोर्डे, चंद्रशेखर जाधव, कुंदन कसबे, विशाल कसबे, गौरव चौधरी, तारीक रिजवी, कबीर मोहम्मद, सचिन नेटके, वैभव किरवे, दिपक जाधव, तुषार पाटील, अनिरुध्द कांबळे, विष्णू करपे, शैलेश अनंतराव, विजय ओव्हाळ, बिपीन जॉन्सन आदी उपस्थित होते. 

loading image