मृताच्या टाळूवरचे ‘ते’ खाताहेत लोणी

रेमडेसिव्हिर इंजेक्शन जादा दराने विकून रुग्णांची आर्थिक लूट केली. शिवाय आठ-दहा दिवस मृत्यूशी झुंज देऊन प्राण सोडणाऱ्यांच्या अंगावरील दागिनेही चोरट्यांनी सोडले नाहीत.
Corona
CoronaSakal

पिंपरी - कोरोना (Corona) झाला की रुग्ण (Patient) आणि कुटुंबीय (Family) हादरून जाते. मग सुरू होते धावपळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्याची आणि महागडी औषधे (Medicine) मिळविण्याची. प्रकृती गंभीर झाल्यावर तर नातेवाइकांची तारांबळ उडते. यातूनच रुग्ण दगावल्यावर सारेच हतबल होतात आणि याच मानसिकतेचा फायदा उठवत रुग्णांच्या ऐवजावर डल्ला मारण्यासह शिल्लक औषधांचा काळाबाजार (Blackmarket) करण्याची प्रवृत्ती काही रुग्णालयांत शिरली असल्याचे उघड झाले आहे. आजवर पाच गुन्हे दाखल असले तरी रुग्ण गेला, नको आता तक्रार करीत बसायला, म्हणून पोलिसात जाणे टाळले असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. (Corona Deathbody Jewellery Loot Hospital)

वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी औषधांचा काळाबाजार केला. रेमडेसिव्हिर इंजेक्शन जादा दराने विकून रुग्णांची आर्थिक लूट केली. शिवाय आठ-दहा दिवस मृत्यूशी झुंज देऊन प्राण सोडणाऱ्यांच्या अंगावरील दागिनेही चोरट्यांनी सोडले नाहीत. कोरोना बाधिताला इंजेक्शन, सलाईनचे दुखणे तर नातेवाइकांना मानसिक त्रास अशा संकटांचा सामना करीत असताना चोरीचे प्रकार घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

कुटुंबातील सदस्य सोडून गेल्यानंतर या दुःखातून सावरणे कुटुंबाला कठीण जाते. मात्र, त्याच्या जवळची वस्तू आठवण म्हणून जपली जाते. मात्र, हीच वस्तू चोरीला गेल्याचे समजल्यानंतर कुटुंबाला आणखीच धक्का बसतो. मोबाईल, दागिना हे चोरट्यांसाठी केवळ किमती वस्तू असतात. मात्र, कुटुंबीयासाठी आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीची आठवण असते. माझ्या मामीच्या अंगावर कायम दागिने असायचे म्हणून रुग्णालयात दाखल करतानाही मंगळसूत्र, चेन, अंगठी, कर्णफुले तसेच अंगावर होते. दहा दिवस उपचार सुरू होते. ती दगावल्यावर अंगावर दागिने नव्हते. त्यावर चौकशी केल्यावर समाधानकारक उत्तरे मिळाली नव्हती. त्यामुळे तिचे दागिने तिच्यासोबत असे म्हणून शांत राहण्याचा निर्णय आम्ही कुटुंबीयांनी घेतला, असे आकुर्डीचे यशवंत पोवार यांनी सांगितले.

Corona
दिलासादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये आज डिस्चार्ज झालेल्या रुग्णापेक्षा नवीन रुग्णांची संख्या कमी

मृत्यूनंतर उरतात इंजेक्शन

रेमडेसिव्हिर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री केल्याच्याही घटना उघडकीस आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मागील महिनाभरात केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये ३१ इंजेक्शन जप्त केली आहेत. या कारवाईतील आरोपींमध्ये रुग्णालयातील परिचारिका, परिचारक, सफाई कर्मचारी यासह खासगी व्यक्तींचा समावेश आहे. रुग्ण दगावल्यानंतर त्याचे उरलेले इंजेक्शन काळ्याबाजारात जादा दराने विकल्याचेही काही घटनांमध्ये समोर आले.

चोरीच्या पाच घटना

नेहरूनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयात मागील महिनाभरात ऐवज चोरीला जाण्याच्या पाच घटना घडल्या. मंगळसूत्र, कानातील फूल, सोन्या-चांदीच्या अंगठ्या, मोबाईल, रोकड, पॅनकार्ड, आधार कार्ड, पॉलिसी कार्ड, एटीएम असा एक लाखाचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी वेगवेगळे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर येथील कोविड रुग्णालयात रुग्णास दाखल करून घेण्यासाठी नातेवाइकांकडून एक लाख रुपये घेतल्याचा प्रकारही उघडकीस आला. याप्रकरणी चार डॉक्‍टरांना अटक झाली.

हेल्पलाइन

कोरोनापीडित नागरिकांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केली आहे. ८०१०४३०००७, ८०१०८१०००७, ८०१०४६०००७, ८०१०८३०००७ या क्रमांकावर नागरिक संपर्क साधून तक्रार करण्यास मदतही मागू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com