पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनर उलटला

पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनर उलटला

कामशेत (ता. मावळ) : येथे  पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर उलटला. शनिवारी (ता. १५) पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विनोद नंदकुमार चौधरी (वय ३८, रा. उत्तर प्रदेश) असे अपघातात किरकोळ जखमी झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास वाहनचालक कंटेनर (एमएच ४३, वाय ५७२१) घेऊन चाकणवरून मुंबईकडे चालला होता. कामशेत हद्दीत मुंबई-पुणे लेनवर अचानक वळण आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. अपघातात वाहनचालक विनोद चौधरी यांच्या डाव्या हाताला मार लागला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंटेनर रस्त्यावर उलटल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी कामशेत पोलिस समीर शेख, संदीप शिंदे आणि होमगार्ड आदी घटनास्थळी दाखल झाले. कामशेत पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे १५ मिनिटांत कंटेनर दोन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार राम कानगुडे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com