
Pratap Sarnaik
Sakal
पिंपरी : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याच बदलीच्या आदेशाला आणि त्याआधी कारवाईला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगारातील दोन अधिकाऱ्यांनी दाद लागू दिलेली नाही. यातील एका महिला अधिकाऱ्याने तर वल्लभनगर आगारात बदली करून घेतली, तर दुसरा अधिकारी चालढकल करून अखेर बदलीच्या ठिकाणी रुजू झाला.