कंत्राटी आरोग्य कामगारांबाबत आमदार महेश लांडगेंनी केली ही मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

  • आमदार लांडगे यांची आयुक्तांकडे मागणी 

पिंपरी : महापालिकेच्या आरोग्य विभागात सेवेत 23 वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी रुजू करावे, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. कंत्राटी कामगारांमध्ये घंटागाडी कर्मचारी, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक, आरोग्य सेविका आदींचा समावेश आहे. 

गणपती विसर्जनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये 'हा' झाला बदल

पिंपरी-चिंचवडकरांनो! महापालिका आयुक्तांनी लागू केली नवीन नियमावली

महापालिकेतील सत्ताधारी भाजपने डॉक्‍टर भरती प्रस्ताव आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी अस्थापनेवर घेण्याबाबतची उपसूचना सर्वसाधारण सभेत मंजूर केली आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी तत्काळ करावी, अशी मागणी लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकात केली आहे. त्यात म्हटले आहे की, पनवेल आणि मुंबई महापालिकेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिदिन 300 रुपये भत्ता द्यावा. कोविड काळात सलग सेवा दिलेल्यांना बाल आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत कर्मचारी, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकण कार्यक्रमांतर्गत रुजू करून घ्यावे. सफाई संवर्गातील दोन हजार 593 पदे मंजूर आहेत. त्यातील रिक्त असलेली आठशे पदे भरावित. घंटागाडी कर्मचाऱ्यांनाही महापालिका सेवेत घ्यावे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, चतुर्थ श्रेणीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना महापालिका अस्थापनेवर रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव यांच्या उपस्थितीत ऑटो क्‍लस्टर सभागृहात कर्मचारी प्रतिनिधींसमवेत बैठक झाली. त्यात कर्मचाऱ्यांची बाजू आयुक्तांसमोर मांडण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: contract health workers should be hired in municipal service demand by mla mahesh landage