esakal | पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढतेय

बोलून बातमी शोधा

Coronavirus Free Patients
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढतेय
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - तपासणीसाठी संशयितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे संसर्गही अधिक दिसतो आहे. म्हणजेच, ट्रेसिंग व टेस्टिंगचे प्रमाण वाढवून ट्रीटमेंटमचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. त्याच बरोबर बरे होऊन घरी जाणाऱ्यांची अर्थात डिस्चार्ज मिळणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. आजपर्यंत एक लाख ९५ हजार ९२९ रुग्णांपैकी एक लाख ६९ हजार २३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २४ हजार १४३ रुग्ण उपचार घेत आहेत.

महापालिका वायसीएम, नवीन जिजामाता, नवीन भोसरी, तालेरा या रुग्णालयांसह अन्य आठ रुग्णालयांतही संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे. तसेच, वायसीएमच्या आवारात फ्लू क्लिनिक व समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. बालेवाडी स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, बालनगरी भोसरी, चिखली घरकूल बिल्डिंग पाच ते आठ, दहा व बारा आणि महाळुंगे म्हाडा इमारत, सामाजिक न्याय विभागाचे मोशी मुलांचे वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. वायसीएम हॉस्पिटल, ऑटो क्लस्टर व नेहरूनगर मगर स्टेडियम जम्बो रुग्णालये, डॉ. डी. वाय. पाटील व आदित्य बिर्ला हॉस्पिटल या ठिकाणी डेडिकेटेड हेल्थ सेंटर सुरू केले आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारे लक्षणानुसार रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

हेही वाचा: 14 ऑक्सिजन प्लॅंटच्या खरेदीसाठी 48 तासांत जमा झाला 13 कोटींचा निधी

अशी आहे पद्धत

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महापालिकेतर्फे रुग्ण तपासणीपासून उपचारासाठी दाखल करणे. आणि बरे झाल्यानंतर डिस्चार्ज मिळेपर्यंतची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. त्यामुळे रुग्ण व बेड व्यवस्थापनात शिस्तबद्धता आली आहे. संशयित व्यक्ती तपासणीसाठी केंद्रावर (टेस्ट सेंटर) येते. ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे माहिती नसते. अशा टेस्ट झालेल्या मात्र, लक्षणे असलेल्या व्यक्तींना रिपोर्ट येईपर्यंत कोविडसदृश्य रुग्णालयात ठेवले जाते. रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार पद्धती ठरवली जात आहे. पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींकडे घरी स्वतंत्र सोय असल्यास होमआयसोलेशन केले जाते. घरी सोय नसल्यास कोविड केअर सेंटरला पाठवले जाते. रुग्णांच्या प्रकृतीनुसार ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर बेडची सोय असलेल्या ठिकाणी दाखल करून उपचार केले जात आहेत. अतिदक्षता विभागात प्रकृती सुधालेल्या रुग्णास विलगीकरणाची आवश्यकता असते. त्यांनी टप्प्याटप्प्याने सामान्य परिस्थितीत आणण्यासाठी उपचार केले जातात. अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये किंवा होमआयसोलेनमध्ये (गृहअलगीकरण) केले जाते. पूर्ण बरे झाल्यावर डिस्चार्ज दिला जातो. गृहअलगीकरणातील रुग्णांशी कॉल सेंटरमार्फत संपर्क साधला जात आहे. प्रसंगी डॉक्टरही रुग्णांशी संवाद साधत आहेत, अशी माहिती महापालिकेचे प्रवक्ता शिरीष पोरेडी यांनी सांगितले.