...अन् मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विप्रोचे राज्य सरकार सदैव ऋणी राहील

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

विप्रोतर्फे उभारलेल्या कोरोना रुग्णालयाचा हिंजवडीत लोकार्पण सोहळा. मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन उपस्थितीत उरकला उदघाटन समारंभ

हिंजवडी : आयटी क्षेत्रात नावाजलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने राज्यातील कोरोना रुग्णासाठी तयार केलेल्या साडेचारशे बेडच्या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा हिंजवडी आयटी नगरीत पार पडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

पुण्याजवळील हिंजवडी आयटीपार्कमध्ये अवघ्या दीड महिण्यात अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेले 450 बेडचे पाच मजली रुग्णालय उभारल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हेडिओ कॉन्फरन्सव्दारे ऑनलाईन पद्धतीने संवाद साधत विप्रोचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी यांचे आभार मानले.  ऑनलाइन प्रास्तविक करताना रिशद प्रेमजी यांनी कोरोनाचे संकट पाहून रूग्णालय उभारण्यामागची विप्रोची भूमिका स्पष्ट केली.

पुणे : अपघातास कारणीभूत ठरलेली अष्टापुर येथील 'ती' विहिर बुजवणार

या उद्घाटन सोहळ्याला विप्रोचे उपाध्यक्ष हरिप्रसाद हेगडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप जठार, हिंजवडीचे ग्रामविकास अधिकारी तुलसीदास रायकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ''संपूर्ण जगाला ग्रासलेल्या या विषाणूवर मात करण्यासाठी अद्याप लस किंवा औषध तयार झालं नसलं तरी राज्याने आरोग्य सुविधा व सेवा पुरविण्यात मोलाचे कार्य केले आहे. सुरुवातीला कोरोना तपासणीकरीता केवळ 2 तपासणी केंद्र होती ती आता 80 च्या आसपास आहेत. लवकरच आपण 100 चा आकडाही गाठू. सुरुवातीला उपचार करणारी केवळ 3 रुग्णालय होती आता राज्यात 1484 ठिकाणी उपचार घेता येतात. दोन महिण्यापूर्वी मास्क, पीपी किट कुठून उपलब्ध करायची असा प्रश्न असताना आज आपण अवघ्या 15 दिवसांत 1000 बेडच रुग्णालय उभारतोय हे राज्य सरकारच्या कामाचं यश म्हणावं लागेल. आणि म्हणूनच विप्रो सारख्या नामकीत कंपनीने राष्ट्रहितासाठी पुढाकार घेऊन सरकारला जे सहकार्य केले ते वाखाणण्याजोगे आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ठाकरे पुढे म्हणाले, त्यांचा प्रस्ताव ज्यावेळी माझ्याकडे आला होता त्यावेळी मी तत्काळ त्यांना मान्यता दिली होती. आणि म्हणूनच आज माझ्या अपेक्षेपेक्षा चांगल आणि एक दर्जेदार रुग्णालय इथे उभारले, त्याबद्दल विप्रोचे राज्य सरकार सदैव ऋणी राहील. सध्या कोरोना ज्या पटीने वाढतो आहे त्या पटीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे सरकार पुढे आव्हानच आहे.मात्र या रूग्णालयात कोरोना रुग्णाचा शिरकाव होऊच नये अस आम्हाला वाटत. आणि झालाच तरी तो रुग्ण लवकर तंदुरुस्त होऊन घरी जाओ आशा सदिच्छा देऊन या सामाजिक कार्याबद्दल त्यांनी पूनस्य विप्रोला धन्यवाद दिले.या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक तुळशीदास घोलप यांनी तर आभार जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Hospital in Hinjewadi built by Wipro