esakal | पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत ७६१३ बेड
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत ७६१३ बेड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहर परिसरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने खाटांचे व्यवस्थापन (बेड मॅनेजमेंट) व गृहविलगीकरणातील रुग्ण (होम आयसोलेट) यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले असून, हेल्पलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. सध्या खासगी, महापालिका व सरकारी रुग्णालये मिळून सात हजार ६१३ खाटा (बेड) उपलब्ध आहेत. यात कोविड केअर सेंटरसह ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचाही समावेश आहे.

बेड मॅनेजमेंट हेल्पलाइन

बेड मॅनेजमेंट हेल्पलाइन चोवीस तास सुरू आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनोज सेठिया (संपर्क - ९९२२५०१७३६) व जयकुमार गुजर (संपर्क - ९९२२५०११३८) यांची नियुक्ती केली आहे. कॉलसेंटरचे क्रमांक ६७३३११५१ आणि ६७३३११५२ असे आहेत. दोन्ही क्रमांकाच्या प्रत्येकी पाच लाइन असून, दहा ऑपरेटर नियुक्त केले आहेत.

होम आयसोलेट हेल्पलाइन

होम आयसोलेट रुग्णांसाठी एक डॉक्टर व एक सहायक, असे दोन पथक आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत रुग्णांशी संपर्क साधून वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. यासाठी ६७३३११४१ आणि ६७३३११४२ हे हेल्पलाइन क्रमांक असून, प्रत्येकी चार अशा आठ लाइन आहेत. त्यासाठी आठ ऑपरेटर नियुक्त केले आहेत.

हेही वाचा: रेमडेसिव्‍हिर हवंय, मिळेल का?

स्वास्थ्य हेल्पलाइन सेंटर

होम आयसोलेट रुग्णांच्या मदतीसाठी स्वास्थ्य हेल्पलाइन सेंटर सुरू केले आहे. यासाठी ११ पथके नियुक्त केले असून, सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत रुग्णांशी दररोज संवाद साधला जात आहे. रुग्णाचा ताप, ऑक्सिजन पातळी, खोकला, सर्दी, अन्य काही त्रास अशी माहिती घेऊन रुग्णांना मदत केली जात आहे.

पारंपरिक पद्धतीने दहन

शहरातील सध्याचे पॉझिटिव्हचे प्रमाण १९.२२ टक्के आणि मृत्यूदर १.५१ टक्के आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तींवर सध्या विद्युत व डिझेल, अशा पाच दाहिन्यांमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र, अंत्यविधीसाठी विलंब होऊ नये, यासाठी सर्व स्मशानभूमींमध्ये पारंपरिक पद्धतीने लाकडांद्वारेही अंत्यविधी केले जाणार आहेत. यासाठी २० कामगार वाढविण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेडी यांनी दिली.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हेही वाचा: आरोग्य जनतेचं सांभाळायचं की स्वत:चं? पोलिसांसमोर प्रश्न

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका स्तरावर अधिकारी नियुक्त केले आहेत. रुग्ण अथवा नातेवाइकांना काही अडचणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी व हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

- राजेश पाटील, आयुक्त, महापालिका

दृष्टिक्षेपात बेड

कोविड केअर सेंटर - २३१८

ऑक्सिजन विरहित - १७१९

ऑक्सिजन बेड - २५४४

आयसीयू बेड - ६९५

व्हेंटिलेटर बेड - ३३७

एकूण - ७६१३