पिंपरी-चिंचवडमध्ये आज कोरोनाचा हाहाकार! दिवसभरात रुग्णांची संख्या सहाशेच्या जवळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020


- आजपर्यंतचा उच्चांकी आकडा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी तब्बल 573 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले. आजपर्यंत हा सर्वांत धक्कादायक आकडा ठरला आहे. काल सायंकाळी पाच वाजता असलेला 4288 पॉझिटिव्हचा आकडा आज तब्बल 4861 वर पोचला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचा आलेख चढताच आहे. सामान्य माणसांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत, नोकरदारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांना बाधा झाली आहे. या शिवाय रुग्ण तपासणीची संख्यासुद्धा वाढविण्यात आली आहे. यासाठी खासगी लॅबचीही मदत घेतली जात आहे. 

हेही वाचा- मावळात आज दहा नवे पॉझिटिव्ह, तर एकाचा मृत्यू 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी सायंकाळी पाचपासून सोमवारी रात्रीपर्यंत 573 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 373 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी रात्रीपर्यंत 4861 झाली आहे. सध्या 1863 जण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत एकूण 2931 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 67 जणांचा मृत्यू झाला आहे. आज गांधीनगर पिंपरी येथील 31 संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यात तिघांची चाचणी पॉझिटिव्ह आली. आज मृत झालेला रुग्ण खेड (पुरुष, वय- ५५) येथील रहिवाशी होता.

हेही वाचा- आयटी परिसराची चिंता वाढविणारी बातमी; दोन दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा एवढा वाढला

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं. चिं. मनपामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच, पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही. याची काळजी घ्यावी व सोबत किमान एक तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infection to 573 people in Pimpri-Chinchwad city