कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कातील होमगार्डला कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

शुक्रवारी (ता.२६) भोसरी येथे स्थायिक असलेल्या पोलिसासह लोणावळ्यातील रेल्वे विभागातील पोर्टरचाळीतील ५७ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळले होते. पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील कर्मचारी, होमगार्ड, ट्रॅफीक वॉर्डन असे पाच जणांचे तर महिलेच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील मुले, सुना आणि नातवंडे असे सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 

लोणावळा : कोरोनाबाधित सापडलेल्या लोणावळा शहर पोलिस दलातील पंचवीस वर्षीय पोलिस कर्मचाऱ्या संपर्कात आलेला एक होमगार्डला कोरोनाची लागण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील होमगार्डचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून इतर चार जणांसह महिलेच्या संपर्कातील सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
शुक्रवारी (ता.२६) भोसरी येथे स्थायिक असलेल्या पोलिसासह लोणावळ्यातील रेल्वे विभागातील पोर्टरचाळीतील ५७ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळले होते. पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील कर्मचारी, होमगार्ड, ट्रॅफीक वॉर्डन असे पाच जणांचे तर महिलेच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील मुले, सुना आणि नातवंडे असे सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 

पिंपरी : सलूनची दुकाने उद्यापासून सुरू होणार, पण दर 'हे' असतील 

महिनाभरापूर्वी खंडाळ्यात सत्तर वर्षीय वृद्ध आणि त्याची सुन कोरोनाबाधित आढळली होती. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर एकही रुग्ण आढळला नव्हता. दुबईहून आलेली ५३ वर्षीय महीलेसह नौदल प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजीतील ११ प्रशिक्षणार्थी जवान कोरोनाबाधित असून लोणावळ्यात आता सक्रीय रुग्णांची संख्या १४ झाली आहे.

पिंपरी : महापौर, पक्षनेत्यांकडून कंटेन्मेंट झोनची पाहणी; नागरिकांना केली ही विनंती

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infects home guards in contact with corona infected police