esakal | दिलासादायक! कोरोना, म्यूकरमायकॉसिस रुग्णांचा वॉर रूम घेते ‘फॉलोअप’
sakal

बोलून बातमी शोधा

War Room

दिलासादायक! कोरोना, म्यूकरमायकॉसिस रुग्णांचा वॉर रूम घेते ‘फॉलोअप’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - आपण हॉस्पिटलमध्ये (Hospital) ॲडमिट होता, किती दिवस, ऑक्सिजन (Oxygen) लावला होता, शुगर किंवा इतर काही गंभीर आजार जसे की कॅन्सर, किडनीचे आजार आहेत, काही त्रास सध्या, घशात खवखव, खोकला, कफ, ताप, अंग व छातीमध्ये दुखत आहे, सर्दी, नाक वाहणे, नाकाशी संबंधित काही समस्या जाणवताहेत, डोळ्यांचा त्रास किंवा चेहऱ्यावर सूज किंवा दातांशी संबंधित त्रास किंवा डोकेदुखी आहे, श्वास घ्यायला काही त्रास होतोय, डॉक्टरांनी (Doctor) दिलेली औषधे (Medicine) वेळेवर घेत आहात ना. डॉक्टरांशी संवाद साधायचा आहे?... अशा प्रकारची सहानुभूतिपूर्वक चौकशी ‘कोविड-१९ वॉर रूम’च्या (Covid-19 War Room) यंत्रणेमधून नागरिकांना दिलासा दिला जात आहे. गेल्या सव्वा वर्षापासून अव्याहत हे काम सुरू आहे. (Corona Mucormycosis Patients Followup by War Room)

कोरोना व आता म्यूकरमायकॉसिस विरुद्ध यशस्वी लढा देण्यासाठी ‘वॉर रूम’ उभारण्यात आली आहे. यामध्ये बेड मॅनेजमेंट सिस्टीम व डॅश बोर्डद्वारे खासगी दवाखान्यांतील स्थिती, निगेटिव्ह आलेली रुग्ण संख्या, तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुना चाचणीची संख्या, होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या दर्शविली आहे. सध्या हॉस्पिटलमधून माहिती घेण्यासाठी १० कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये काम करत आहेत. तर नागरिकांच्या असलेल्या हेल्पलाइनसाठी दोन पाळ्यांमध्ये दोन कर्मचारी काम करत आहेत. आयसोलेशनसाठी आठ जण कॉल करत असून दोन डॉक्टर तब्येतीची विचारपूस करत आहेत. याशिवाय पोस्ट कोविडचे काम एका खासगी एजन्सीला दिले आहे. यात देखील कॉलचे प्रमाण अधिक आहे.

हेही वाचा: आरोपीने अटक टाळण्यासाठी स्वतःच्या अंगावरच केले ब्लेडने वार

वॉर रूमचा हा आहे फायदा...

आरोग्याची स्थिती

गंभीर - जर पेशंटला शुगर/किडनीचा आजार/कॅन्सरसारखा आजार असोत किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये असताना ऑक्सिजन लावलेला असेल. तसेच त्यांना जर काही डोळे, नाक, घसा आणि दात यांच्याशी संबंधित त्रास असेल व सर्दी असेल यावरून रुग्णांना पुढील उपचार पद्धती ठरविल्या जात आहेत.

मध्यम - जर पेशंटला शुगर/किडनीचा आजार/कॅन्सरसारखा आजार असेल तसेच त्यांना हॉस्पिटलमध्ये असताना ऑक्सिजन लावलेला असेल, तसेच सर्दी असेल तर त्यांना योग्य सल्ला दिला जात आहे.

सौम्य - जर पेशंटला शुगर/किडनीचा आजार/कॅन्सरसारखा आजार असेल, त्यांना हॉस्पिटलमध्ये असताना ऑक्सिजन लावलेला असेल आणि कसलाही त्रास नसेल तरीही काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. दिवसाआड अशा सर्व रुग्णांना कॉल करून विचारपूस केली जात आहे. त्यानंतर रुग्णांच्या नावापुढे विशिष्ट शेरा दिला जात आहे.