esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये आज 192 नवीन रुग्ण; तर चार रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

कोरोना संसर्ग झालेले 192 नवीन रुग्ण रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 92 हजार 159 झाली आहे. आज 142 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 88 हजार 179 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दोन हजार 352 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 987 रुग्ण महापालिका रुग्णालयांत उपचार घेत असून एक हजार 365 जण होम आयसोलेट आहेत. आज शहरातील चार रुग्णांचा मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 192 नवीन रुग्ण; तर चार रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोना संसर्ग झालेले 192 नवीन रुग्ण रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 92 हजार 159 झाली आहे. आज 142 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 88 हजार 179 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दोन हजार 352 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 987 रुग्ण महापालिका रुग्णालयांत उपचार घेत असून एक हजार 365 जण होम आयसोलेट आहेत. आज शहरातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 628 आणि बाहेरील 668 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 177 घरांमधील तीन हजार 920 नागरिकांची तपासणी केली. त्यातील 411 व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरातील आज मृत्यू झालेले नागरिक पुरुष सांगवी (वय 72 व 65), पिंपरी (वय 65) आणि महिला देहूरोड (वय 65) येथील रहिवासी आहेत. आज शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही. ही दिलासादायक बाब ठरली आहे. 

सध्या शहराबाहेरील 140 रुग्ण महापालिका रुग्णालयांत दाखल आहेत. शहराबाहेरील आठ व्यक्तींचा रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आला. आजपर्यंत शहराबाहेरील सात हजार 32 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील 218 रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 

चोरट्यांनी दागिन्यांसह चोरले अंडरवेअर, बनियानही; बोपखेल येथील घटना

आज दोन हजार 561 जणांची तपासणी करण्यात आली. आज दोन हजार 227 जणांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. एक हजार 757 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. आजपर्यंत चार लाख 70 हजार 363 जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर, तीन लाख 76 हजार 447 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आजपर्यंत तपासलेल्या संशयित रुग्णांपैकी चार लाख 65 हजार 970 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil