पिंपरी चिंचवड शहरात आज 990 रुग्ण आढळले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

पिंपरी चिंचवड शहरात आज दिवसभरात 990 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 33 हजार 484 झाली आहे.

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आज दिवसभरात 990 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 33 हजार 484 झाली आहे. आजपर्यंत एकूण 23 हजार 672 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात नऊ हजार 538 जणांवर उपचार सुरू आहेत. आज मयत तेरा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 549 झाली आहे. 

आज मयत झालेल्या व्यक्ती निगडी (पुरूष वय ६७), मोशी (पुरूष वय ४८), रहाटणी (पुरूष वय ५१) चिंचवड (पुरूष वय ७९), चिंचवड (पुरूष वय ६७), दापोडी (पुरूष वय ७८), देहूरोड (पुरूष वय ६८), भोसरी (स्त्री वय ४७), निगडी (स्त्री वय ८४), तळवडे (स्त्री वय ५८), तळवडे (स्त्री वय ५८), थेरगाव (स्त्री वय ७१), जुन्नर (स्त्री वय ६३) येथील रहिवासी आहेत.

हे वाचा - पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या अडचणी काही कमी होईनात; रक्तसाठा पडतोय कमी

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updat pimpari chinchwad 14 august report