Coronavirus: नव्या कोरोना रुग्णांसाठी भोसरी रुग्णालय

Coronavirus: नव्या कोरोना रुग्णांसाठी भोसरी रुग्णालय

पिंपरी - इंग्लंडमध्ये सार्स कोविड-२ विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्या रूपाने एसएआरएस सीओव्ही-२चे स्वतंत्र फिलोजेनेटिक क्‍लस्टर सापडले आहे. यामुळे इंग्लंडमधून दुबई व अन्य देशांतून शहरात येणाऱ्या प्रवाशांना वाकडमधील दोन हॉटेल्समध्ये क्वारंटाइन केले जाणार आहे. त्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी नवीन भोसरी रुग्णालय राखीव ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली. 

इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने घेतलेल्या निर्णयाबाबत अतिरिक्त आयुक्त पवार म्हणाले, ‘‘इंग्लंडमधून देशात येणारी विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, इंग्लंडमध्ये राहून दुबई वा अन्य देशात गेलेल्या व शहरात येणाऱ्या रुग्णांमुळे नव्या कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. याची खबरदारी म्हणून अशा प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. सध्या नवीन भोसरी रुग्णालयात कोरोनाचे १८ रुग्ण आहेत. त्यांना अन्य रुग्णालयात दाखल करून नव्या रुग्णांसाठी भोसरी रुग्णालय राखीव ठेवले आहे. त्याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला असून, साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायदा संपूर्ण महापालिका क्षेत्रात लागू केला आहे. आलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची आणि रुग्णालय व क्वारंटाइन सेंटरसाठी स्वतंत्र डॉक्‍टर्स, नर्स, अन्य कर्मचारी नियुक्त केले आहेत.’’ 

येथे आहे सोय
थेट किंवा अप्रत्यक्ष उड्डाणाद्वारे इंग्लंडमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांचे वाकडमधील हॉटेल जिंजर व सयाजीमध्ये सात दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. त्याचा खर्च प्रवाशांना करावा लागणार आहे. प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना उपचारासाठी महापालिकेच्या भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

असा आहे आदेश
सात दिवसांच्या क्‍वारंटाइन काळात पाच ते सातव्या दिवसादरम्यान हॉटेलमध्येच खर्चाने आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल.
अहवाल निगेटिव्ह आलेल्यांना पाच ते सात दिवसांनी घरी सोडणार
आरटी-पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास १४ दिवस क्वारंटाइन
इंग्लंडमधून येणाऱ्यांची वाहतूक व्यवस्था पीएमपीच्या बसमधूनच
हॉटेलच्या शुल्कानुसार प्रवाशांना हॉटेलचे शुल्क भरावे लागेल.
पासपोर्ट जमा केले जातील आणि घरी जाताना परत करणार
आरटी-पीसीआर चाचणीचे शुल्क प्रवाशांकडून वसूल केले जाईल
इंग्लंडमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाची योजना विचारात न घेता सर्व अटी लागू राहतील
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com