पिंपरी-चिंचवड शहरात आज शून्य मृत्यू;127 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 December 2020

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 737 आहे. तर, शहराबाहेरील 714 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महापालिका रुग्णालयांत 752 रुग्ण उपचार घेत आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 127 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 95 हजार 563 झाली आहे. आज 129 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 92 हजार 83 झाली आहे. सध्या एक हजार 743 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील व बाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली. 

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 737 आहे. तर, शहराबाहेरील 714 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महापालिका रुग्णालयांत 752 रुग्ण उपचार घेत आहेत. 991 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोन मधील 903 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 54 जणांची तपासणी करण्यात आली. आज 678 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 80 हजार 823 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

शहीद जवान सुजित किर्दत, नागनाथ लोभे यांना पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी

आज दोन हजार 396 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील एक हजार 826 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज रुग्णालयातून दोन हजार 398 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 42 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

आजपर्यंत पाच लाख 32 हजार 241 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 35 हजार 636 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 28 हजार 317 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुण्यात आलेला गवा कसा गेला, वाचा सविस्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zero deaths in Pimpri-Chinchwad today and Found 127 new patients