esakal | 'रेमडेसिव्हिर'चा काळाबाजार; नगरसेविकेच्या मुलाला अटक

बोलून बातमी शोधा

remdesevir

पुणे पोलिसांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात पाच जणांना अटक केली.

'रेमडेसिव्हिर'चा काळाबाजार; नगरसेविकेच्या मुलाला अटक
sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेविकेच्या मुलाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. वैभव अंकुश मळेकर (वय २०, रा. चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो चिखली प्रभाग एकच्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांचा मुलगा आहे.

हेही वाचा: रेमडेसीव्हीर इंजेक्शन काळ्याबाजाराने विकणारा जेरबंद

पुणे पोलिसांनी रविवारी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात पाच जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सहा इंजेक्शन जप्त केले आहेत. याप्रकरणी खडकी, अलंकार आणि डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, खडकी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शुभम नवनाथ आरवडे (वय २२) व वैभव मळेकर यांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त केले आहेत.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरच्या रिकाम्या बाटल्या ‘बोलणार’

यातील आरोपींनी हे इंजेक्शन अवैधरीत्या मिळवून ते स्वतःच्या ताब्यात बाळगले होते. तसेच, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या इंजेक्शनची ते बेकायदेशीररित्या वैध किमतीपेक्षा जास्त किंमतीला विक्री करत होते. त्यांच्याकडे डॉक्टरांचे कोणतेही प्रिस्क्रिप्शन नसतानाही या इंजेक्शनची विक्री करताना ते आढळून आले आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.