#couplechallenge : 'कपल चॅलेंज'चा सोशल मीडियावर धुरळा

सुवर्णा नवले
Wednesday, 23 September 2020

हजारो नेटीझन्सने फोटो केले शेअर : लाईक्‍स, कमेंट्‌सचा पाऊस​

पिंपरी : सोशल मीडियावर दिवसेंदिवस कोणता हटके ट्रेंड व्हायरल होईल सांगता येत नाही. अल्वधीतच 'कपल चॅलेंज' हॅशटॅगने धुमाकूळ घातला आहे. पती-पत्नीने एकमेकांच्या फेसबुक वॉलवर आठवणीतले फोटो शेअर करून स्पर्धेत बाजी मारली आहे. काहींनी फोटोला सकारात्मक कमेंटही दिल्या आहेत. कृष्णधवल फोटोवरून हास्याचे फवारे देखील उडत आहेत. परंतु नेमका हा ट्रेंड पेरतं कोण? नेटिझन्स याला बळी कसे पडतात? हे न उमगलेलं कोडं आहे. मात्र, या ट्रेंडला गांभीर्याने घेत हितचिंतकांनी फोटो शेअर न करण्याची विनवणीही सोशल मीडियावर केलेली दिसून येत आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही दिवसांपूर्वीच 'नथीचा नखरा' चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या चॅलेंजलाही महिलांनी डोक्‍यावर घेतलं. टिका-टिपण्णीही झाली. मात्र, कोरोनामुळे घरी बसून वैतागलेले नेटिझन्स सध्या प्रत्येक सोशल स्पर्धेत हिरीरीने भाग घेताना दिसून येत आहे. त्यात कपल चॅलेंजने उडी मारली. पिंपरी-चिंचवड शहरातही आमदार, खासदार यांचे फोटोही नागरिकांनी शेअर केले आहेत. बऱ्याच जणांनी आयुष्यातील गोड आठवणीतल्या क्षणांचा व्हिडीओ तयार करुन तो कपल चॅलेंजसाठी शेअर केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पक्षाच्या नेत्यांचेही कपल फोटो शेअर
माजी केंद्रिय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभा पाटील यांचे कृष्णधवल फोटो शेअर केले आहेत. तर काहींनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, शरद पवारांचे नातू रोहित पवार व त्यांच्या पत्नी कुंती पवार यांचे फोटो नेटिझन्सनी जोरदार शेअर केले आहेत. आवडत्या नेत्याला भरभरून कमेंटही दिल्या आहेत.
 

पुण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम थंडावले

सिंगल्याचीही विनोदात उडी
सिंगल म्हणजेच अविवाहीत असणाऱ्या जोडप्यांना या स्पर्धेत उडी घेता न आल्याने त्यांनी सोशल मीडियावर विनोद केले आहेत. 'लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्यांना असे हिणवू नये, लॉकडाउननंतर कोरोनाने हैराण आणि त्यात अशा स्पर्धा घेऊन दु:खावर मीठ चोळण्याचा हा प्रकार' असल्याचे बोलले गेले आहे. बऱ्याच जणांनी या ट्रेंडची खिल्लीही उडवली आहे.

सोशल मीडियामुळे आयुष्य खासगी नाही
सुज्ञ नेटिझन्सनी खासगी फोटो खासगी राहू द्यात अशी विनंती देखील केली आहे. फोटो व व्हिडीओ शेअर करून कोणताही पुरस्कार मिळत नाही. सोशल मीडियाच्या प्रवाहात खेचण्याचा हा एक डाव आहे. याला बळी पडू नये असाही सल्ला दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Couple Challenge' hashtag trends on social media