esakal | 'या' सर्वेक्षणासाठी उद्या लोणावळा शहर राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

'या' सर्वेक्षणासाठी उद्या लोणावळा शहर राहणार बंद

लोणावळ्यात सुरू असलेल्या कोरोनाचा उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने मंगळवारी (ता. 15) महासर्वेक्षण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी रवी पवार यानी दिली.

'या' सर्वेक्षणासाठी उद्या लोणावळा शहर राहणार बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : लोणावळ्यात सुरू असलेल्या कोरोनाचा उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने मंगळवारी (ता. 15) महासर्वेक्षण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी रवी पवार यानी दिली. मंगळवारी शहर बंद राहणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?

पिंपरी-चिंचवडकरांनो सावधान! थुंकल्यास होणार हजार रुपयांचा दंड 

मोहिमेदरम्यान स्वयंसेवकाच्या मदतीने शरीराचे तापमान आणि ऑक्‍सिजन पातळी तपासण्यात येणार आहे. कोविड सदृश लक्षणे असणाऱ्यांना तातडीने अँटिजन टेस्ट करण्यात येईल. कोविड नियंत्रण, मृत्युदर रोखण्यासाठी 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी लोणावळा, खंडाळ्यासह नगरपरिषद हद्दीत बंद ठेवण्यात येणार असून, तीन वर्षांवरील प्रत्येक नागरिकांची तपासणी होणार आहे. यासाठी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, आशा वर्कर, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी होणार आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी विकार आदी सहव्याधी असणाऱ्या रुग्णांची नोंद घेतली जाणार आहे. 

'दोन हजार अँटिजेन टेस्ट करणार' 

या मोहिमेत दोन हजार अँटिजेन टेस्ट करण्याचे उद्दीष्ट असून, यासाठी तीनशे स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संशयित रुग्णांची डीसी हायस्कूल खंडाळा, वाघाड सॅनिटोरियम, भुशी, खंडाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय शाळा क्र.1, संत ज्ञानेश्वर विद्यालय शाळा क्र.5 भांगरवाडी या सहा ठिकाणी संशयित रुग्णांसाठी आयसोलेशनची सोय करण्यात आल्याचे मुख्याधिकारी रवी पवार यांनी सांगितले. 
 

loading image