esakal | पिंपरी-चिंचवड : क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
sakal

बोलून बातमी शोधा

Betting

भारत व इंग्लड क्रिकेट सामन्यावर दुर्बिणीच्या साहाय्याने सट्टा लावणाऱ्या रॅकेटचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एकाच वेळी तीन ठिकाणी केलेल्या या कारवाईत ३३ सट्टेबाजांना अटक केली.

पिंपरी-चिंचवड : क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वाकड पोलिसांकडून ३३ सट्टेबाजांना अटक; तीन ठिकाणी कारवाई, ४५ लाखांचा ऐवज जप्त
पिंपरी - भारत व इंग्लड क्रिकेट सामन्यावर दुर्बिणीच्या साहाय्याने सट्टा लावणाऱ्या रॅकेटचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एकाच वेळी तीन ठिकाणी केलेल्या या कारवाईत ३३ सट्टेबाजांना अटक केली.

कार्तिक राजकुमार चावला (वय २८, रा. नवी दिल्ली), गोविंद राजेश मणिहार (वय ३१, रा नागपूर), गौरव हरीश वाधवा (वय ३०, रा. हरियाना), रेमंड सामुअल कयादो (वय २१, रा. गोवा), अमित सुभाष चौधरी (वय २५, रा. मध्य प्रदेश), गजानन बळीराम यादव (वय ३४, रा. हडपसर, मांजरी), मुनिष रामकुमार सैनी (वय ३१, रा. दिल्ली), सागर यशपाल नारंग (वय २०), प्रेमजित रमेशचंद्र (वय २०, दोघे रा. हरियाना), विशालसिंग जितेंन्द्रसिंग भदोरीया (वय २४), सतेंद्रसिंग महेंद्रसिंग गुज्जर (वय २७, दोघे रा. मध्य प्रदेश), रामविरसिंग मनफुलसिंग बेनिवाल (वय ३४, रा. हरियाना), मनीष कैलासचंद्र लाहोटी (वय ४०, रा. राजस्थान), अमितकुमार श्रीराजकुमार राजपूत (वय २७, रा. हरियाना), शादाब अनिस अहमद खान (वय २७, रा. उत्तर प्रदेश), राहुल जयप्रकाश राजपूत (वय २७), राजेंद्र नैमतराम वधवा (वय ३९, दोघे रा. हरियाना), भारतकुमार किशनलालजी सुहालगा (वय ४०, रा. राजस्थान), दिलीप लालचंद जैन (वय ३४, रा. मालाड, ईस्ट मुंबई), विजय अमरलाल हेमनानी (वय ३५, रा. नागपूर), केनेडी अशोक करमचंदानी (वय ३५, रा. नागपूर), उजास महिंद्रा पटेल (वय ३८, रा. मालाड, मुंबई), नीलेश महेश सर्वय्या (वय ३२, मालाड, पूर्व मुंबई), अनिल गणेश सोनी (वय ३२, मध्य प्रदेश), हिमांशु सुरेशकुमार हासिझा (वय २८, रा. हरियाना), कमलेश किशोर चावला (वय ३५, रा. हरियाना), अनिकेत निरंजन कोठारे (वय २८, रा. नागपूर), रिक्की हंसराज बिरमणी (वय ३४), जतीन सुभाष सेठी (वय २८), सचिन जगदीश बत्रा (वय ३२), लविश राकेश चावला (वय २९, चौघे रा. हरियाना), पंकज ज्ञानेश्वर महेर (वय २५, रा. वडगाव शेरी), अविनाश हरिभाऊ वडमारे (वय ३६, रा. वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे आरोपी शुक्रवारी (ता. २६) गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत व इंग्लंड एकदिवसीय वन डे क्रिकेट सामन्याचे दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून सामन्याच्या बॉल टू बॉल माहितीच्या आधारे काही जण ऑनलाइन सट्टा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांनी मामुर्डी गावात गोदरेज ग्रीनपार्क या नावाने सुरू असलेल्या ट्रायकॉन इन्फ्रा बिल्डटेक या इमारतीच्या छतावर, घोराडेश्वर डोंगरावरून व चंदननगर येथील हॉटेल लेमन ट्री येथे छापा टाकला. या वेळी आरोपी क्रिकेट सामन्यावर सट्टा लावताना आढळले. हे आरोपी भोपाळ येथील बुकी भोलू व नागपूर येथील बुकी चेतन ऊर्फ सोनू यांच्या संपर्कात राहून त्यांना या सामन्याची माहिती देत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून बॉल टू बॉलची माहिती पुरवून त्या माहितीच्या आधारे तसेच, ऑनलाइन असलेल्या बेटिंग ॲपद्वारे प्रेक्षेपणामध्ये असलेल्या काही सेकंदाच्या उशिराचा फायदा घेऊन हे आरोपी सट्टा खेळत व खेळवत होते. या कारवाई दरम्यान आरोपींनी दोन पोलिसांना धक्काबुक्की करीत आरडाओरडा करीत दहशत माजवली.

४४ लाख ८७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी ७५ मोबाईल, तीन लॅपटॉप, एक लाख २६ हजार ४३० रुपयांची रोकड, २८ हजारांचे परकीय चलन, चार दुर्बीण, आठ कॅमेरे, एक स्पीकर, एक मोटार असा एकूण ४४ लाख ८७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींवर देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास गुन्हे शाखा युनिट चारचे पथक करीत आहे.

Edited By - Prashant Patil

loading image