पिंपरी-चिंचवड : जी. एस. महानगर बॅंकेच्या संचालक मंडळावर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

  • अपहार केल्याचा आरोप
  • व्यवस्थापकाही दोषी 

पिंपरी : खातेदाराने जमा केलेले धनादेश खातेदाराच्या खात्यावर जमा न करता दहा लाखांचा अपहार केल्याप्रकरणी जी. एस. महानगर बॅंक भोसरी शाखेच्या संचालक मंडळासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे. 

व्यवस्थापक अभिजीत कस्तुरे (वय 35, रा. आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ, चिंचवड), कुमार मुरलीधर नरवडे (वय 53) यासह महानगर बॅंक भोसरी शाखेचे अध्यक्ष व संचालक मंडळ सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी बाबासाहेब बाळासाहेब जासूद (रा. कोनार्क नगर, फेज 1, विमाननगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांचे भाव कडाडले; पिंपरी-चिंचवडमधील आजचा भाव जाणून...

फिर्यादीने सात लाख 25 हजार व दोन लाख 75 हजारांचे दोन धनादेश बॅंकेत जमा केले होते. मात्र, हे धनादेश फिर्यादीच्या खात्यावर जमा न करता परस्पर गायब करून एकूण दहा लाख रूपयांचा अपहार करीत फिर्यादीची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 3 ते 5 ऑक्‍टोबर 2016 या कालावधीत जी.एस. महानगर बॅंकेच्या भोसरी शाखेत घडला. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime on board of directors of g s mahanagar bank at pimpri chinchwad