फडणवीसांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पूर्णानगर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांवर चप्पल फेकण्यात आली
crime Fadnavis convoy throwing slippers case registered pimpri
crime Fadnavis convoy throwing slippers case registered pimprisakal

पिंपरी : पूर्णानगर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांवर चप्पल फेकण्यात आली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.(inauguration of Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Park)

याप्रकरणी अजय संभाजी पाताडे ( रा. पूर्णानगर चिंचवड ) यांनी फिर्याद दिली आह. रविवारी सायंकाळी पूर्णानगर येथे फडणवीस यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन होते . या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. दरम्यान, फडणवीस यांचा ताफा आला असता काहीजणांनी चपल्या, बांगड्या, पाण्याच्या बाटल्या ताफ्यातील वाहनांवर फेकल्या. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com