esakal | पोलिसांचा वचक संपला; आकुर्डीत भरदिवसा घरफोडी
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांचा वचक संपला; आकुर्डीत भरदिवसा घरफोडी

दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात शिरलेल्या चोरट्याने 70 हजारांचा ऐवज लंपास केला.

पोलिसांचा वचक संपला; आकुर्डीत भरदिवसा घरफोडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात शिरलेल्या चोरट्याने 70 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना आकुर्डी येथे भरदिवसा घडली. जॉसी अँटोनी लोबो (रा. गणेश अपार्टमेंट, गणेशनगरीजवळ, आकुर्डी प्राधिकरण रोड, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली. 

पिंपरी-चिंचवडकरांनो, आजचा दिवस काढावा लागणार पाण्याविना; उद्याही पाण्याची शक्यता कमीच

फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना सोमवारी (ता. 5) सकाळी पावणेसहा ते सायंकाळी चार या कालावधीत अज्ञात चोरटा दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात शिरला. बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यातील सोनसाखळी व सोन्याच्या दोन अंगठ्या, असा एकूण 70 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भरदिवसा घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यासह नागरिकांकडे चौकशी केली जात आहे.