निवृत्त सहायक फौजदाराच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न, घरावरही दगडफेक

पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली घटना; आरोपी मोकाट ; देहूरोड येथील प्रकार
crime update Attempt to kill retired assistant magistrate throwing stones at his house
crime update Attempt to kill retired assistant magistrate throwing stones at his housesakal

पिंपरी : मुलाला शिवीगाळ व दमदाटी केल्याची पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एकाने निवृत्त सहायक फौजदाराच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. देहूरोड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्यानंतर त्याने सहायक फौजदाराच्या घरासमोर राडा घालून घरावर दगडफेकही केली. परिसरात दहशत माजवली. यामुळे या कुटुंबासह परिसरातील रहिवाशीही भीतीच्या सावटाखाली आहेत. हा प्रकार देहूरोड येथील साईनगर येथे घडला. देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला ती आरोपी मात्र अदयाप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

सहायक फौजदाराच्या घरासमोर राडा घालून घरावर दगडफेक
सहायक फौजदाराच्या घरासमोर राडा घालून घरावर दगडफेकsakal

अनंता कृष्ण शिंदे (रा. गणेशनगर, साईनगर, देहूरोड) असे प्राणघातक हल्ला झालेल्या निवृत्त सहायक फौजदराचे नाव आहे. त्यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत कृष्ण विरण (वय १९, रा. चिंतामणी चौक, मामुर्डी, साईनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा मुलग विकी याना आरोपीने शिवीगाळ व दमदाटी केल्याने त्याच्याविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याचा आरोपीला राग होता. दरम्यान, ही तक्रार देऊन शिंदे व त्यांचा मुलगा घरी परतत होते. या दरम्यान, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सेंट्रल चौक ते मामुर्डीतील साईनगरकडे जाणाऱ्या मार्गावर आरोपीने त्याच्या मोटारीने शिंदे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही त्यानंतर तो शिंदे यांच्या घरासमोर गेला. घरात शिंदे यांची पत्नी व मुलगी असताना घरासमोर राडा घातला. जोरजोरात शिवीगाळ व दमदाटी करीत घरावर दगडफेक केली. परिसरात दहशत माजवली. या प्रकारामुळे या कुटुंबासह परिसरातील रहिवासी भीतीच्या सावटाखाली आहेत. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com