शिक्षक भरती, पोलिसांचा छापा अन्‌ चर्चा 

police
police

पिंपरी - आर्थिक गुन्हे शाखेने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात बुधवारी सकाळी छापा टाकला. यानंतर आता मॅडमचे काय होणार? अशी चर्चा दोन दिवसांपासून महापालिका वर्तुळात रंगली आहे. त्यात मॅडम दोन दिवसांपासून रजेवर असल्यामुळे चर्चेला अधिकच उधाण आले आहे. शिक्षक भरतीसाठी खोटी कागदपत्रे तयार करत अधिकाऱ्यांशी संगनमत करून लाखो रुपयांचे व्यवहार केल्याचे हे प्रकरण आहे. 

शिक्षकांच्या बनावट मान्यता तयार करून त्यांना वेतन सुरू करण्याप्रकरणी शिक्षक भरती प्रकरण पुन्हा चर्चेला आले आहे. यातील दोषींवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखला करण्यात आलेला आहे. शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता, तुकडी मान्यता अशा चार हजार 11 प्रकरणांची चौकशी सुरू आहे. 

बुधवारी (ता.12) सकाळी दहा वाजता गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संशयित म्हणून प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांची चौकशी केली. त्यांच्याकडे महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणी केली. पोलिसांनी दहा वर्षाचे रेकॉर्ड मागविले आहे. परंतु त्यांच्याकडे ते उपलब्ध नसल्याचा शिंदे यांनी जबाब दिल्यामुळे पोलिसांनी उपलब्ध महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे संभाजी शिरसाट यांच्या घरावरही छापा टाकल्याने सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान, या प्रकरणात 2010 मध्ये ज्या शिक्षकांनी वैयक्तिक मान्यता घेतली, अशांची चौकशी होणार आहे. त्यांची कागदपत्र तपासण्यात येणार असल्याने शिक्षक टेन्शनमध्ये आले आहेत. सगळ्यांनी सकाळीच शिक्षण विभाग गाठले होते. परंतु प्रशासन अधिकारीच नसल्यापाहून प्रत्येकजण घरी परतल्याचे समजते. 

प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे म्हणाल्या, ""मी कामानिमित्त मुंबईत आहे. शिक्षक भरतीप्रकरणी पोलिसांनी दहा वर्षाची माहिती मागवली होती. उपलब्ध माहिती त्यांना दिली आहे. '' 

पूर्वी नवनगर मंडळाची शाळा, आता स्वतः:ची 
चिखली -मोरेवस्ती येथील शिवछत्रपती प्राथमिक शाळेत संभाजी शिरसाट मुख्याध्यापक आहेत. यापूर्वी ही शाळा नवनगर शिक्षण मंडळाची होती. मंडळाचे संचालक गोविंद दाभाडे होते. त्यावेळी त्यांच्या शाळेत शिरसाट मुख्याध्यापक होते. गेल्यावर्षी दाभाडे यांनी शिरसाट यांना ही शाळा हस्तांतरित केली आहे. सध्या त्या शाळेशी आमचा काही संबंध नसल्याचे नवनगर शिक्षण मंडळाकडून सांगण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com