esakal | पिंपरी : ७ वर्षांच्या मुलीची अत्याचारानंतर हत्या, नराधमास साडेतीन वर्षांनी अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

पिंपरी : ७ वर्षांच्या मुलीची अत्याचारानंतर हत्या, नराधमास साडेतीन वर्षांनी अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून (Murder) करणाऱ्या नराधमाला अखेर पोलिसांनी (Police) अटक केली आहे. तब्बल साडे तीन वर्षांनंतर आरोपी (Accused) पोलिसांच्या हाती लागला आहे. (Criminal who Sexually Assaulted and Murdered the Girl Arrested Crime)

राजकुमार उर्फ पॅरेलाल चंद्रप्रकाश कुरील-यादव (वय ३७, रा. पानी का पूरवा, मजरा कोरथा, बी. बी. गाव, बिरसिंगपूर, कानपूरनगर, उत्तरप्रदेश) असे या नराधमाचे नाव आहे. पिंपरीतील पत्राशेडमध्ये राहणाऱ्या सात वर्षीय बालिकेला पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने २४ सप्टेंबर २०१८ ला पिंपरी पोलिस ठाण्यात दिली होती. तपास सुरु असतानाच २७ सप्टेंबरला दुपारी बाराच्या सुमारास नेहरूनगर येथील एच.ए मैदानावरील झुडपात बालिकेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे व पुरावा नष्ट करण्यासाठी डोक्यात दगड घातल्याचे समोर आले. या घटनेमुळे खळबळ उडाली. तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता कुरील हा बालिकेला घेऊन गेल्याचे स्पष्ट झाले होते. आरोपीच्या शोधासाठी उत्तरप्रदेसह ठीकठिकाणी पथके रवाना केली. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही. फेब्रुवारी २०२० ला हा तपास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाकडे देण्यात आला. पथकाने उत्तरप्रदेशला जाऊन फिल्डिंग लावली. खबऱ्यांची मदत घेत त्यांना मोबाईल पुरवून त्यांच्या संपर्कात राहिले. अखेर, खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याला जेरबंद करण्यात पथकाला यश आले.

हेही वाचा: 'अनुकंपा' उमेदवारांचं प्रशिक्षण आयुक्तांच्या परवानगीअभावी रखडले

... अन जाळ्यात अडकला

९ जुलैला कुरील हा त्याच्या गावात आल्याचे खबऱ्यामार्फत पथकाला समजले. पथक तातडीने उत्तरप्रदेशला रवाना झाले. तो राहत असलेल्या ठिकाणी सापळा रचला. घराच्या परिसरात असतानाच त्याला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्याला १९ जुलैपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

चॉकलेटचे आमिष

बालिकेच्या घराशेजारीच राहणारा आरोपी बालिकेला चॉकलेट व इतर वस्तू देण्याचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधायचा. अशातच बालिका गायब झाल्यापासून आरोपीही गायब होता. घटनेच्या दिवशी आरोपी बालिकेला घेऊन जात असल्याचे काही जणांनी पहिले होते. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता आरोपी निष्पन्न झाला.

हेही वाचा: आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी?

या धक्क्याने आई-वडिलांनीही जग सोडले

या घटनेच्या धक्क्याने मुलीच्या वडिलांचे महिनाभरातच निधन झाले. पोटची मुलगी व पतीच्या जाण्याने मुलीची आईही खचली. अन्न-पाणी गोड लागत नव्हते. यामुळे प्रकृती खालावली. यानंतर काही दिवसातच मुलीच्या आईनेही जगाचा निरोप घेतला.

तब्ब्ल साडे तीन वर्षांनी लागला पोलिसांच्या हाती

घटनेनंतर आरोपी पसार झाला. वेगवेगळी पथके नेमूनही तो हाती लागला नाही. गंभीर प्रकरण असतानाही तपासात कसलीही प्रगती होत नसल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत होता. बालिकेच्या आईनेही वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, केवळ तपास सुरु आहे एवढेच उत्तर मिळायचे.

loading image