लॉकडाउनमध्येही पिंपरी-चिंचवडकरांचा आखाड दणक्यात होणार; कारण...

लॉकडाउनमध्येही पिंपरी-चिंचवडकरांचा आखाड दणक्यात होणार; कारण...
Updated on

पिंपरी : पाच दिवसांच्या कडक लॉकडाउनची घोषणा केल्यामुळे शहरातील चिकन आणि मटण खरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केली आहे. अनेकांनी सकाळपासून दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या. आखाडानिमित्ताने अनेकांनी चिकन-मटणाचा स्टॉक करून ठेवला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चिकनबद्दल अनेक अफवा पसरविण्यात आल्या होत्या. त्यामुळे चिकन घेण्यास कोणीही तयार नव्हते. परिणामी चिकन विक्रेत्यांनी दर कमी करून जीवंत कोंबड्यांची विक्री केली. यामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. तसेच, कोट्यवधींची उलाढाल थंडावली. अफवा कमी झाल्यानंतर चिकन खाणाऱ्यांच्या संख्येत हळूहळू वाढ झाली. आता कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता पुन्हा एकदा आयुक्तांनी 13 जुलैपासून लॉकडाउन जाहीर केल्यामुळे चिकन, मटन विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे खवय्यांच्या पदरी निराशा पडली. 

शहरात चिंचवडगाव, मोरवाडी, आकुर्डी, कासारवाडी, पिंपरीगाव, निगडीनाका, रुपीनगर या भागात सुमारे 200 हून अधिक चिकनची दुकाने आहेत. अनेकांनी आखाडाच्या निमित्ताने अनेकांनी पाच दिवसांसाठी पुरेल इतका चिकण-मटणाचे साठा करून ठेवण्यासाठी सकाळीच भल्या मोठ्या रांगा खवय्यांनी दुकानांसमोर लावल्या होत्या. शहरात मटणाचे दर 650 ते 700 रुपये, तर चिकनची प्रति किलो 240 ते 250 रुपयांनी विक्री केली जात आहे. तरीही खरेदीसाठी चिकन दुकानात खवय्यांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी अनेक दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले असले, तरी काही दुकानांमध्ये त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे पाहायला मिळाले.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com