
शहरात संचारबंदी लागू केलेली आहे, तरीही मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर अनेक जण वावरताना दिसतात. बुधवारी (ता. 23) रात्री शहरात ठिकठिकाणी पाहणी केली असता, नागरिक बिनधास्त वावरत होते.
पिंपरी - ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने राज्यामध्येही खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका क्षेत्रात रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातही ही संचारबंदी लागू आहे. मात्र, तरीही अनेक नागरिक रात्री बिनधास्त रस्त्यावर फिरत आहेत. पोलिस बंदोबस्त व नाकाबंदीही दिसून येत नाही.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडकरांनो, ख्रिसमसनिमित्त शहरात नवीन नियम लागू
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. यासह रात्री अकरा ते पहाटे सहा या वेळेत रस्त्यावर फिरण्यास मनाई असून, शहरात संचारबंदी लागू केलेली आहे, तरीही मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर अनेक जण वावरताना दिसतात. बुधवारी (ता. 23) रात्री शहरात ठिकठिकाणी पाहणी केली असता, नागरिक बिनधास्त वावरत होते. काही ठिकाणी दुकाने, हॉटेल बंद होती. मात्र, नागरिक व वाहनांची वर्दळ सुरू होती. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नाशिक फाटा चौक, कासारवाडी, मोरवाडी या परिसरात नेहमीप्रमाणेच वर्दळ होती. काही नागरिक वाहनाने, तर काहीजण पायी फिरत होते. दरम्यान, पोलिस बंदोबस्तही कुठेही दिसून आला नाही. नाकाबंदी नव्हती, की वाहनांची तपासणीही नाही. यामुळे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना विचारणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये 148 नवे रुग्ण