कोयत्याने केक कापणे पडले महागात'; 'बर्थडे बॉय'सह दोघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे दोघांना चांगलेच महागात पडले. बर्थडे बॉय आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला असून बर्थडे बॉयच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना  दापोडी गावात घडली.

पिंपरी - कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे दोघांना चांगलेच महागात पडले. बर्थडे बॉय आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला असून बर्थडे बॉयच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना  दापोडी गावात घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समीर सियाज बागसिराज (वय 20, रा. दापोडी), सोहेल शेख (रा. दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी समीर याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई सागर आनंद जाधव यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता. 5) आरोपी सोहेल याचा वाढदिवस होता. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरोपी समीर याने नियोजन केले होते. 

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतेय मॉर्निंग वॉकसाठी गर्दी 

शनिवारी रात्री दहाच्या सुमारास दापोडी गावातील पीएमपीएमएल बस थांब्यासमोर दोघांनी मिळून लोखंडी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केला. कोयत्याने केक कापून आरोपींनी हत्यार प्रदर्शन करत परिसरात दहशत पसरवली. त्यामुळे सोहेल आणि मित्र समीर या दोघांवर भोसरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cutting cakes scythe expensive Crime Birthday Boy