मोशीत तरुणाचा खून; ओळख लपविण्यासाठी मृतदेह जाळला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 February 2021

मृताची ओळख लपविण्यासाठी आरोपींनी ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळला आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

पिंपरी : मोशीतील प्राधिकरण येथे तरुणाचा खून झाल्याची घटना घडली असून मृताची ओळख लपविण्यासाठी मृतदेह ज्वलनशील पदार्थ टाकून जाळला आहे. प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 11 पार्क दहा येथील मोकळ्या मैदानात गुरुवारी (ता. 18) एक मृतदेह आढळला. तीस ते चाळीस वय असलेल्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.

आणखी वाचा - पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार

मृताची ओळख लपविण्यासाठी आरोपींनी ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळला आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासनीसह नागरिकांकडे चौकशी करून आरोपींचा शोध घेत आहेत. अधिक तपास सुरु आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील मागील वीस दिवसांतील खुनाची सहावी घटना आहे. यातील दोन खुनाच्या घटनेतील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अशातच आणखी एक घटना समोर आली आहे. या घटनेतील मृतांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead body were burned to hide the identity murder of a young man in Moshi