पिंपरी-चिंचवडलगतची सात गावे समाविष्ट करण्याचा निर्णय कधी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

पुणे महापालिकेत लगतची २३ गावे नुकतीच समाविष्ट करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत लगतची गावे समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्तावही सरकारकडे पडून आहे. त्यावर केव्हा निर्णय होणार? आणि निर्णय झाल्यास त्या गावांमध्ये पाणी, रस्ते, कचरानिर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापन अशा मूलभूत सुविधा पुरविण्यास महापालिकेची यंत्रणा पुरेशी ठरणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी - पुणे महापालिकेत लगतची २३ गावे नुकतीच समाविष्ट करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत लगतची गावे समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्तावही सरकारकडे पडून आहे. त्यावर केव्हा निर्णय होणार? आणि निर्णय झाल्यास त्या गावांमध्ये पाणी, रस्ते, कचरानिर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापन अशा मूलभूत सुविधा पुरविण्यास महापालिकेची यंत्रणा पुरेशी ठरणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. कारण, शहराला पुरेशा सुविधा पुरविण्यात महापालिका प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. यात पाणी, कचरानिर्मूलन, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन आदींचा समावेश आहे.

एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी अवघ्या 197 विद्यार्थ्यांची नोंदणी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत लगतची हिंजवडी, माण, मारुंजी, गहुंजे, नेरे, सांगवडे, जांबे आदी गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविला आहे. त्या बरोबरच पुण्यालगतच्या २३ गावांबाबतचा प्रस्तावही होता. त्यास गेल्या महिन्यात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वेकडील वाघोलीपासून पश्‍चिमेकडील बावधन महाळुंगेपर्यंतची गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. आता पिंपरी-चिंचवडलगतच्या सात गावांचा निर्णय कधी अशी चर्चा सुरू झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्याची यंत्रणाच अपुरी
शहराची लोकसंख्या २५ लाखांपेक्षा अधिक गृहीत धरली जात आहे. पाणीपुरवठा, कचरा संकलन व निर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापन अशा सुविधा पुरविण्यास महापालिकेची यंत्रणा कमी पडत आहे. अशुद्ध जलउपसा व जलशुद्धीकरण यंत्रणा पुरेशी नसल्याने गेल्या चौदा महिन्यांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. कचरा संकलनासाठी ठेकेदारांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्याच्या निर्मूलनासाठी असलेला मोशी डेपो पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याने नाल्यांद्वारेही सांडपाणी नदीत मिसळले जात आहे. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढत आहे.

शहरात बर्ड फ्ल्यू नाही; महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय यांची माहिती

प्रशासनाचे पत्र
महापालिकेत हिंजवडी, माण, मारुंजीसह लगतची अकरा गावे समावेश करण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर कार्यवाही करण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्तांचा अभिप्राय मागविला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पत्र राज्याच्या उपसचिवांनी दोन महिन्यांपूर्वीच पाठविले आहे.

शहरालगतची गावे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ११ गावे समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर विभागीय आयुक्तांचा अभिप्राय मागितला आहे.
- सतीश मोघे, उपसचिव, राज्य सरकार

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision taken to include seven villages near Pimpri Chinchwad municipal