esakal | 'पिंपरी-चिंचवडमधील क्रीडांगणे सुरू करा'
sakal

बोलून बातमी शोधा

'पिंपरी-चिंचवडमधील क्रीडांगणे सुरू करा'

शहरातील हॉटेल, दुकाने, रिक्षा सेवा, पीएमपी सर्व सुरू झाले आहेत. मात्र, अद्यापही क्रीडांगणे बंद आहेत.

'पिंपरी-चिंचवडमधील क्रीडांगणे सुरू करा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील हॉटेल, दुकाने, रिक्षा सेवा, पीएमपी सर्व सुरू झाले आहेत. मात्र, अद्यापही क्रीडांगणे बंद आहेत. खेळाडूंसाठी सर्व क्रीडांगणे खुली करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुभाष राणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. 

नॉन कोविड रुग्णांसाठी उपलब्ध होणार 50 टक्के बेड; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय  

लॉकडाउन झाल्यापासून शहरातील क्रीडांगणे बंद आहेत. इन डोअर व आऊट डोअर खेळ बंद आहेत. आता कोरोना संसर्ग कमी होऊ लागला आहे. लॉकडाउनचे नियमही शिथिल केले आहेत. हॉटेल, रिक्षा, पीएमपी, एसटी यांना परवानगी दिली आहे. मात्र, क्रीडांगणे सुरू केली जात नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजी आहे, असे राणे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

पिंपरी-चिंचवड : ताथवडेतील रस्त्याचा डाव भाजपच्याच अंगलट

राणे म्हणाले, "खेळाडू आणि विविध क्‍लब बरोबर चर्चा केली आहे. क्रिकेट, फुटबॉल, बास्केट बॉल व दहा वर्षांखालील खेळाडूंना फिटनेससाठी सांघिक खेळ खेळण्यास परवानगी द्यावी. त्यासाठी ठरवून दिलेल्या नियम व अटींचे पालन केले जाईल.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खेळाडूंच्या सोयीसाठी साफसफाई करून क्रीडांगणे व मैदाने उपलब्ध करून द्यावीत. तसेच, संजय गांधी मैदानाचे सपाटीकरण करणे, सीमा भिंत बांधणे, वॉकिंग ट्रॅक दुरुस्त करणे, स्वच्छतागृह बांधणे अशी कामे करणे आवश्‍यक आहे. मात्र, लॉकडाउनमुळे ती होऊ शकलेली नाहीत. आता अशी कामे लवकरात लवकर करून क्रिडांगणे खुली करावीत, असेही राणे यांनी पत्रात म्हटले आहे.