esakal | आकुर्डीत रिक्षाचालकांनी वेधले लक्ष; विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर केली निदर्शने 
sakal

बोलून बातमी शोधा

आकुर्डीत रिक्षाचालकांनी वेधले लक्ष; विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर केली निदर्शने 

गेल्या सात महिन्यांपासून रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे चालकांचे हाल होत आहेत.

आकुर्डीत रिक्षाचालकांनी वेधले लक्ष; विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर केली निदर्शने 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : गेल्या सात महिन्यांपासून रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे चालकांचे हाल होत आहेत. मात्र, रिक्षाचालकांच्या विविध समस्यांकडे सरकारने दखल घेतली नाही. रिक्षाचालकांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आकुर्डीतील अप्पर तहसील कार्यालयात सोमवारी (ता. 12) क्रांती रिक्षा सेनेकडून निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार गीता गायकवाड यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंदोलनास सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयासमोर सुरुवात झाली. 'व्यवसाय पूर्ववत करावा', 'व्यवसायावरील सर्व निर्बंध हटवावे', 'कर्ज माफ करावे', 'आर्थिक पॅकेज जाहीर करावे', 'रिक्षाचा मुक्त परवाना बंद करावा', 'ओला, उबेरसारख्या खासगी कंपन्या बंद कराव्यात', 'सरकारने स्वतःची ऍप कंपनी सुरू करावी', 'सरकारने रिक्षाचालकांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी', 'रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे', अशा विविध मागण्यांचे फलक रिक्षाचालकांनी हातात घेतले होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

क्रांती रिक्षा सेनेचे अध्यक्ष श्रीधर काळे म्हणाले, "गेल्या महिन्यापासून क्रांती रिक्षा सेनेकडून अनेकदा लक्षवेधी निदर्शने केली आहेत, तरी सरकार रिक्षाचालकांच्या मागण्याचा विचार करत नाहीये. राज्य सरकारच्या अखत्यारीतील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यास, तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मागण्यांचा पाठपुरावा करावा. अन्यथा आम्हाला मुलांबाळासह जेलभरो आंदोलन करावे लागेल.''

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा 

आंदोलनात संतोष निसर्गगंध, सतीश कदम, बाबासाहेब आखाडे, कविता मायनदल, रामा हेंडवळे, सिद्धार्थ शिरसाट, बाबासाहेब आखाडे, परमेश्‍वर तोडमल, दत्ता आभाळे, विश्‍वनाथ कुंभार, महेंद्र थेऊरकर, सुधाकर गुदडे, राजू महमूळकर, अल्ताफ रामपुरे, इब्राहिम पटेल, किमया खांडवीकर, सिद्धांत काळे, सुनील देठे, कैलास जोगदंड, सिद्धार्थ काळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.