'या' मागण्यांसाठी रिक्षाचालकांची वाकडमध्ये निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

  • सरकारचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती रिक्षा सेनेची वाकडमध्ये निदर्शने 

पिंपरी : रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती रिक्षासेनेच्या वतीने वाकड परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी समस्यांचे फलक हातात घेऊन रिक्षाचालकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 

भोसरीतील 'त्या' विद्युत रोहित्राच्या स्फोटानंतर आज पुन्हा 'ही' घटना घडली

क्रांती रिक्षा सेनेकडून रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी साखळी आंदोलन सुरू आहे. त्यानुसार पिंपरीपाठोपाठ वाकडमध्येही निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात गणेश ढेरे, शिवाजी कुंभार, जितू खिलारे, योगेश कुंभार, रामा स्वामी, सुरेश काळे आदींनी सहभाग घेतला. या आंदोलनात गणेश ढेरे, शिवाजी कुंभार, जितू खिलारे, योगेश कुंभार, रामा स्वामी, सुरेश काळे आदींनी सहभाग घेतला. 

रिक्षाचालक म्हणतात... 

रिक्षात प्रवासी बसण्यास तयार नाही. एक वेळेचे पोट भरणे अवघड झाले आहे. असे असताना फायनान्स कंपन्या गुंड पाठवून रिक्षाचालकांकडून कर्जाच्या हप्त्याची जबरदस्ती करीत आहेत. 
- सिद्धार्थ शिरसाट 

रिक्षाचालकांची मानसिकता खराब झाली आहे. जगण्याचा प्रश्‍न आमच्यासमोर उभा आहे. सरकारने कोणतीही मदत केली नाही. जोपर्यत सरकार मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यत आम्ही कर्जाची हप्ते, रिक्षाची पासिंग, इन्शुरन्स भरणार नाही. 
- परमेश्‍वर तोरडमल 

दिल्ली, तेलंगण, आंध्रप्रदेश व इतर काही राज्याने रिक्षाचालकांना लॉकडाउनमध्ये आर्थिक मदत केली. पण महाराष्ट्र सरकारकडे सहा महिन्यांपासून रिक्षा संघटनांनी अनेक वेळा मागण्या करूनही सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. 
- नितीन कुंभार 

कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे. तो डबघाईस आला आहे. प्रादुर्भावामुळे रिक्षात प्रवासी बसत नाहीत. दोन प्रवासी पाहिजे तेवढे भाडे देत नाहीत, त्यामुळे रिक्षाचालकांना आर्थिकदृष्ट्या अडचणी निर्माण झाल्या आहे. समस्या सुटेपर्यंत निदर्शने करीतच राहणार आहोत.
- श्रीधर काळे, संस्थाध्यक्ष, क्रांती रिक्षा सेना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demonstrations of rickshaw drivers for various demands in wakad