नाट्यगृहांच्या भाडे दरात सवलत द्या - अभिनेते प्रशांत दामले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

अनलॉकनंतर नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू झाली आहेत. मात्र, नाटकांसाठीचे भाडेदर जास्त असून परवडणारे नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेने नाटकांसाठी 75 टक्के सवलत देवू केली आहे. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही नाट्यगृहांच्या भाडे दरात सवलत द्यावी, असे साकडे अभिनेते प्रशांत दामले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना घातले.

पिंपरी - अनलॉकनंतर नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू झाली आहेत. मात्र, नाटकांसाठीचे भाडेदर जास्त असून परवडणारे नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेने नाटकांसाठी 75 टक्के सवलत देवू केली आहे. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही नाट्यगृहांच्या भाडे दरात सवलत द्यावी, असे साकडे अभिनेते प्रशांत दामले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना घातले. त्यावर, योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त हर्डीकर यांनी दामले यांना दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात महापालिकेचे चार नाट्यगृहे आहेत. त्यांच्या भाडेदराबाबत चर्चा करण्यासाठी दामले यांच्यासह सांस्कृतिक कार्यक्रम, संयोजन व नाट्य व्यवस्थापक शिष्टमंडळाने गुरुवारी आयुक्त शहर्डीकर यांची भेट घेतली. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,  बाळासाहेब खांडेकर आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने 13 जणांचा आज मृत्यू; तर 231 नवीन रुग्ण

राज्य सरकारने पाच नोव्हेंबरपासून नाट्यगृहे, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण, नाटकांचा खर्च पूर्ण भागवणे अवघड जात आहे. त्यामुळे नाट्यगृहाचे भाडेदर कमी करावे, असे आवाहन दामले यांनी केली आहे. 

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ''नाटककारांच्या काही अडचणी आहेत. आता नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू झाली आहेत. नाट्यगृह, नाटकांचे बुकिंग दर त्यांना  परवडणारे नाहीत. त्यात सवलत द्यावी, असे निवेदन त्यांनी दिले आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.'

Video: डिलिव्हरी बॉयने साकारली 'स्वराज्याची राजधानी'; पिंपरीतल्या युवकाचं होतंय कौतुक!

शहरातील स्थिती
पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाची आसनक्षमता बाराशे आहे. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाची आसनक्षमता 950, संत तुकारामनगरमधील आचार्य अत्रे रंगमंदिराची क्षमता 850 आहे. पिंपळे गुरव येथे नटसम्राट निळू फुले रंगमंदिर आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discount theater rental rates prashant damale