पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने 13 जणांचा आज मृत्यू; तर 231 नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 231 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 91 हजार 515 झाली आहे. आज 85 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 87 हजार 634 झाली आहे. सध्या दोन हजार 267 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील 13 आणि बाहेरील तीन अशा 16 जणांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरात शहरातील मृतांचा आकडा पहिल्यांदा दोन आकडी झाला.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज 231 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 91 हजार 515 झाली आहे. आज 85 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 87 हजार 634 झाली आहे. सध्या दोन हजार 267 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील 13 आणि बाहेरील तीन अशा 16 जणांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरात शहरातील मृतांचा आकडा पहिल्यांदा दोन आकडी झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 614 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 667 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष चिंचवड (वय 80 व 84), काळेवाडी (वय 74), पिंपरी (वय 53), जुनी सांगवी (वय 58), पिंपळे गुरव (वय 72), तळवडे (वय 62) व महिला पिंपरी (वय 75 व 65), चिंचवड (वय 75), दापोडी (वय 70) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष चाकण (वय 48), देहूरोड (वय 54) आणि महिला तळेगाव दाभाडे (वय 70) येथील रहिवासी आहेत.

Video: डिलिव्हरी बॉयने साकारली 'स्वराज्याची राजधानी'; पिंपरीतल्या युवकाचं होतंय कौतुक! 

सध्या महापालिका रुग्णालयांत 876 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 391 रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णालयात दाखल शहराबाहेरील रुग्णांची संख्या 168 आहे. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 995 रुग्ण बरे झाले आहेत. 

२५  हजार रुपये लाच स्वीकारताना लोणावळ्यात दुय्यम निबंधक अटकेत

कंटेन्मेंट झोन मधील एक हजार 354 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 504 जणांची तपासणी करण्यात आली. आज 441 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 68 हजार 610 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad 13 people died 231 new patients corona today