esakal | सायकल भ्रमंती करणाऱ्या तरुणाची पिंपरी-चिंचवडमध्ये चर्चा! 
sakal

बोलून बातमी शोधा

सायकल भ्रमंती करणाऱ्या तरुणाची पिंपरी-चिंचवडमध्ये चर्चा! 
  • ग्रीन इंडियासाठी पुढाकार
  • भारतभर सायकल भ्रमंती 
  • जुनी सायकल केली मॉडिफाय 

सायकल भ्रमंती करणाऱ्या तरुणाची पिंपरी-चिंचवडमध्ये चर्चा! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : आगळी-वेगळी आरामदायी व आकर्षक जुनी सायकल, डोक्यावर मोठी हॅट, रंगीबेरंगी कपडे व राजस्थानी बोली भाषा असलेला सायकलमॅन. त्याची रावेत या भागात एंट्री होताच सर्वांच्या आकर्षणाचा व चर्चेचा विषय ठरला. ग्रीन इंडियाच्या ध्यासाने झपाटलेल्या २४ वर्षांच्या मुरलीधर परिहार याने राजस्थानवरुन सायकल भारत भ्रमंतीला सुरुवात केली आहे. जुन्या सायकलला त्याने मॉडिफाय करून पर्यावरणाप्रती असलेले योगदान मोलाचे ठरले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तो मूळचा राजस्थान, सीकर येथील असून, आत्तापर्यंत तीन केंद्रशासित प्रदेश व दहा राज्यांचा आठ ते दहा हजार किलोमीटर प्रवास केला आहे. अजून १२ ते १३ हजार किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. देश हरित व्हावा तसेच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे या उद्देशाने ही मोहीम त्याने हाती घेतली आहे. २८ ऑक्टोबरला राजस्थानवरुन सायकल यात्रेला सुरुवात केली आहे. राजस्थानवरुन दिल्ली, कुरुक्षेत्र, चंदीगढ, हिमाचल, ऋषिकेश, गाझियाबाद, आग्रा, मथुरा, उज्जैन, गुजरात, अहमदाबाद, द्वारका, सूरत, नाशिक, औरंगाबाद, मुंबईवरून तो पुणे व पिंपरी-चिंचवड या ठिकाणी पोचला. १५ मे रोजी पूर्ण प्रवास संपणार आहे. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सायकलवर राष्ट्रध्वज व गरजेच्या वस्तू तसेच सायकल दुरुस्तीचे साहित्य लावलेले आहे. सायकल स्वतः: बनविलेली आहे. रिक्युमेंट नावाची सायकल पाहिल्यानंतर तशीच हुबेहुब बनविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. त्याला भारतीय जवानांचा सन्मान कायम जनतेच्या मनात राहावा, यासाठी तो प्रबोधन करतो. तसेच भारत स्वच्छ राहण्यासाठी गाव, खेड्यापासून जनजागृती तो करीत आहे. प्रवासात नागरिकांना सायकलचे कुतूहल वाटते. त्यामुळे ते आवर्जून विचारपूस करतात, स्वागतही मनापासून करतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘देश सुजलाम् सुफलाम् व्हावा. पर्यावरणाची हानी टळावी. भारत प्लास्टिक मुक्त व्हावा यासाठी मी धडपड करत आहे. शहीद भगतसिंग यांच्या नावाने मी यात्रेचा प्रारंभ केला. आत्तापर्यंत प्रवासात मिळेल त्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मुक्काम केला आहे. सायकल मॅन ७७ या नावाने माझे सोशल मीडियावर अकाऊंट आहे. रावेत येथे मी सायकल सर्क्हिसिंगसाठी थांबलो होतो. यात्रेदरम्यान खूप बरेवाईट अनुभव येतात. मात्र न डगमगता मी पुढे जातो.’’ 
- मुरलीधर परिहार, सायकलमॅन