esakal | दिवसभर खणखणतात डॉक्टरांचे फोन; म्युकरमायकोसिसमुळे चिंतेत आणखी भर
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor Call

दिवसभर खणखणतात डॉक्टरांचे फोन; म्युकरमायकोसिसमुळे चिंतेत आणखी भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - सर्दी, खोकला किंवा किरकोळ दुखणे असले तरी कोरोना (Corona) काळामुळे प्रत्येकजण काळजीपोटी डॉक्टरांचा (Docotr) सल्ला (Suggesion) घेत आहे. आता ‘म्युकरमायकोसिस’ने (Mucormycosis) नागरिकांच्या (Citizens) चिंतेत भर टाकली आहे. त्यामुळे दिवसभरात आयसीयू, बेड, आजाराची विविध लक्षणे, औषधे, इंजेक्शनसाठी, सल्ल्यांसाठी सरकारी व खासगी दवाखान्यांतील डॉक्टरांचे फोन सतत खणखणताहेत. (Doctor Phone Ringing Mucormycosis Sickness Care Citizens)

खासगी व सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांसाठी हेल्पलाइन असूनही डॉक्टरांसोबत नागरिक सल्लामसलत घेत आहेत. वायसीएम रुग्णालयातही महत्त्वाच्या विभागांमध्ये दिवसभर डॉक्टरांमध्ये विविध आरोग्याशी संबंधित विषयांवर व गुंतागुंतीच्या आजारांवर चर्चा होत असते. यातून रुग्णांवरील उपचार पद्धतीबाबत निर्णय घेतले जातात. सध्या बालरुग्ण विभाग, कान-नाक-घसा, दंतविभाग, फुफ्फुस व औषधे यांच्याशी संबंधित विभागांमध्ये सर्वाधिक धावपळीचे काम सुरू आहे.

हेही वाचा: खासगी रुग्णालयापेक्षा कोरोना उपचारासाठी पालिका रुग्णालयेच बरी

दिवसभरात अतिदक्षता विभागासाठी ८ ते १० कॉल असतात. शिवाय सुमारे १५० कॉल हे रुग्णांच्या विविध समस्यांसाठी असतात. इतर जिल्ह्यांमधूनही कॉल सुरू असतात. म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांबाबतही राज्यभरातून चौकशी सुरू असते. रुग्णवाहिका व इतर गंभीर आजारांविषयी, नॉन कोविडसाठीही बरेच कॉल सुरू असतात. लोकप्रतिनिधींचे कॉल वेगळे.

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

दिवसभरात विविध ठिकाणांहून फोन सुरू आहेत. म्युकरमायकोसिसच्या भीतीने तर कॉलची संख्या वाढली आहे. दिवसभरात पंधरा कॉल होतात. दात किंवा हिरड्यांबाबत समस्या जाणवल्यास, घशात बुरशीसारखे प्रकार दिसल्यास नागरिक तत्काळ उपचारासाठी दाखल होत आहेत.

- डॉ. यशवंत इंगळे, दंतविभाग प्रमुख, वायसीएम रुग्णालय

बरेच रुग्ण मधुमेह किंवा इतर आजारांनी त्रस्त असतात. घशात काळे किंवा पिवळे काही दिसल्यास नागरिक विचारणा करत आहेत. उपचाराबाबत जागरूक झालेले चांगले आहे. कोविडनंतर १० ते ५० दिवसांत काळजी घेणे गरजेचे आहे. ‘‘गालाच्या भागावरील संवेदनशीलता हरवली, घशात फोड आलेत, नाकात चुणचुण होतेय मी काय करू?’’ अशा प्रकारे नागरिक कॉल करतात.

- डॉ. कौस्तुभ कहाणे, डॉ. आदित्य येवलेकर, डॉ. प्रवीण लाठी, कान-नाक-घसा विभाग