पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; पवना धरण ७० टक्के भरले

मावळ तालुका व पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळातील पवना धरणात ६९.११ टक्के पाणीसाठा झाला आहे.
Pawana Dam water
Pawana Dam watersakal
Summary

मावळ तालुका व पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळातील पवना धरणात ६९.११ टक्के पाणीसाठा झाला आहे.

पवनानगर - मावळ तालुका व पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळातील पवना धरणात ६९.११ टक्के पाणीसाठा झाला आहे. जुन महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा जेमतेम १७ टक्क्यांवर आला होता. जुलै महिन्यात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे. अवघ्या पंधरा दिवसात धरणात ५० टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे.

पवना धरण परीसरात आज दिवसभरात २३ मिमी पाऊस झाला असून १ जून पासून धरण परिसरात १४५० मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी आजच्या तारखेला ३७.८५ टक्के इतका पाणी साठा होता तर १ जून पासून धरण परिसरात ७३८ मिमी पाऊस पडला होता. गेल्या वर्षीच्या तुलनने या वर्षी जवजवळ ७१२ मिमी पाऊस जास्त झाला आहे.

गेल्या चार पाच दिवसांपासून मावळ तालुक्यात पाऊसाचा पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी डोंगर भागातून वाहणारे धबधबे, नैसर्गिक जलस्त्रोत खळाळते झाल्याने दिवसेंदिवस पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पवना धरण ७० टक्के भरल्याने नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com