esakal | ‘आयडीटीआर’चा गैरकारभार: वाहन चालक परवाना चाचणीच्या काळात असुविधांशी सामना
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयडीटीआर’चा गैरकारभार: वाहन चालक परवाना चाचणीच्या काळात असुविधांशी सामना

याठिकाणी दररोज पाचशे परीक्षार्थी येतात. परंतु, येथे भेडसावणाऱ्या समस्या, परीक्षा घेताना होणारा गैरकारभार, एजंटांच्या वाहनांचा भरणा असतो. एकंदरीतच या केंद्राचा आढावा घेणारी वृत्तमालिका आजपासून...

‘आयडीटीआर’चा गैरकारभार: वाहन चालक परवाना चाचणीच्या काळात असुविधांशी सामना

sakal_logo
By
सुवर्णा गवारे-नवले - सकाळ वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड शहरातील कासारवाडी येथे वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च-आयडीटीआर) अतिशय अत्याधुनिक व सुसज्ज आहे. कोणतेही वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी येथे चाचणी परीक्षा द्यावी लागते. याठिकाणी दररोज पाचशे परीक्षार्थी येतात. परंतु, येथे भेडसावणाऱ्या समस्या, परीक्षा घेताना होणारा गैरकारभार, एजंटांच्या वाहनांचा भरणा असतो. एकंदरीतच या केंद्राचा आढावा घेणारी वृत्तमालिका आजपासून...

पिंपरी- कोरोनामुळे वाहन परवाना चाचण्या बंद होत्या. गेल्या सहा महिन्यांत लॉकडाउनमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज व वाहन प्रशिक्षणही ठप्प होते. आता सर्वकाही खुले आहे, त्यामुळे वाहन-चालक प्रशिक्षण संस्थेत (आयडीटीआर) परीक्षार्थींची आता गर्दी होत आहे. परंतु, तिथे अपुऱ्या बैठक व्यवस्थेपासूनच्या इतर सोयीसुविधा नसल्याने सर्वांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागते. दिवसभर उन्हात उभे राहून चाचणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ही संख्या साडेचारशे ते पाचशे असते. पिंपरीतून साठ ते सत्तर व पुणे परिसरातून दिवसाकाठी चारशे जण असतात. त्यामुळे मैदान भरून जाते. 

हे वाचा - मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार; स्मशानभूमीतील बेड चोरट्यांनी पळवला!

केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून ‘आयडीटीआर’ उभारले. मात्र, परीक्षार्थींच्या सोयी सुविधांचा विचार केला नाही. अधिकारी वातानुकूलित कार्यालयात आणि परीक्षार्थी उन्हात तिष्ठत अशी स्थिती दिसते. 

मैदानावर आठ, एच व ग्रेडिअंट प्रकारांतील वाहन चालविण्याची परीक्षा घेतली जाते. चाचणीच्या मैदानावर सुमारे ५० वाहने एकावेळी असतात. यात दुचाकी, चारचाकी तसेच बस, रिक्षांचा समावेश असतो. काहीजण रांगेत बसून राहतात, तर काही वैतागून रांग सोडून जागा मिळेल तिथे सावलीचा आधार घेतात. एका समाजसेवी संस्थेने दिलेल्या निवारा शेडशिवाय येथे दुसरी जागा नाही. कारण हे शेड खूप अपुरे आहे. त्यात पन्नास नागरिकांचीही बैठक व्यवस्था नाही. या बाबत आयडीटीआरच्या प्राचार्यासोबत संपर्क साधला असता, त्यांनी उत्तर दिले नाही.

पुणेकरांनो पालिकेच्या एक दिवसाच्या ऑनलाइन सभेचा खर्च बघा

मी सकाळी आठ वाजता या ठिकाणी आलो आहे. आता दुपारचे तीन वाजले तरी चाचणीसाठी नंबर आला नाही. बैठक व्यवस्था नसल्याने उन्हातच उभा आहे. सर्वांचीच माझ्यासारखी स्थिती झाली आहे.   
- हर्शल कोद्रे, हडपसर

सध्या पिंपरीतून साठ जणांनाच परवानगी असून, पुण्याहून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गर्दी वाढली आहे. यापूर्वी आम्ही मोशीमध्ये चाचण्या घेत होतो; पण अलीकडे नाशिक फाटा येथे चाचणी होत आहेत. त्यामुळे पुणे व पिंपरी अशी दोन्ही ठिकाणांहून गर्दी होत आहे. 
- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा