esakal | मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार; स्मशानभूमीतील बेड चोरट्यांनी पळवला!
sakal

बोलून बातमी शोधा

cremation

शिंदेगाव हे चाकण औद्योगिक वसाहतीतील गाव आहे. गावचे नागरीकरण वाढल्याने गावात असणारा दशक्रिया घाट एकमताने गावाबाहेर उभारण्यात आला.

मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार; स्मशानभूमीतील बेड चोरट्यांनी पळवला!

sakal_logo
By
रुपेश बुट्टे-पाटील

आंबेठाण (पुणे) : 'मयताच्या टाळूवरचे लोणी खाणे' हा वाक्यप्रचार आजवर तुम्ही फक्त ऐकला असेल, परंतु याची सत्यता दर्शविणारी घटना नुकतीच शिंदेगाव (ता.खेड) येथे घडली आहे. स्मशानभूमीत प्रेत जाळण्यासाठी असणारा लोखंडी बेड अज्ञात इसमांनी चोरुन नेल्याचा प्रकार येथे घडला आहे. नव्याने उभारलेल्या या स्मशानभूमीत मयत जाळण्यास सुरुवात होण्याआधीच असा प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.

ईडी लागली पत्रकारांच्या मागे; न्यूज क्लिकच्या ऑफिसवर छापा

शिंदेगाव हे चाकण औद्योगिक वसाहतीतील गाव आहे. गावचे नागरीकरण वाढल्याने गावात असणारा दशक्रिया घाट एकमताने गावाबाहेर उभारण्यात आला. तेथेच नव्याने स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. परंतु या स्मशानभूमीला प्रेत जाळण्यास सुरुवात होण्याआधीच ग्रहण लागले असून प्रेत ठेवण्यासाठी असणाऱ्या लोखंडी बेडच्या जाळ्या अज्ञान इसमांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्या आहेत. सोमवारी (दि.८) रात्री देखील येथील काही जाळ्या चोरण्याचा प्रकार घडला आहे. जवळपास पंधरा बीड धातूच्या जाळ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. बीडाच्या जाळ्या चोरून नेल्या असून त्याचे नट-बोल्ट त्याच ठिकाणी पडले आहेत.

सुशांतच्या भावाला मंत्रिपद; नितीशकुमारांची मोठी खेळी​

येथील दशक्रिया विधी घाट आणि स्मशानभूमी परिसर गावातील नागरिकांनी सुधारण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी कधी शासकीय निधी, कधी लोकवर्गणी, तर कधी घरातील व्यक्तीच्या निधनानंतर त्यांची आठवण म्हणून या परिसरात विकास कामे केली जात आहे. परंतु गावकऱ्यांच्या या एकत्रित प्रयत्नाला अशा चोरीच्या घटनेमुळे खो बसत आहे, असे प्रकार निंदनीय असून गावकऱ्यांनी याचा निषेध केला आहे. 

Video: पोलिसांनी केलेल्या बेदम धुलाईचा व्हिडीओ झाला व्हायरल; 2 महिन्यांनी केलं सस्पेंड​

मंगळवारी (दि.९) सकाळी ग्रामस्थ येथे गेले असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत चौकशी करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राहुल पानमंद, दत्तात्रय टेमगिरे, सुनील देवकर, अशोक गायकवाड यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)